आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुग्राम:कोविड काळात बंदी असतानाही पार्टी करणाऱ्या 22 तरुण, 8 तरुणींसह आयोजकावर गुन्हे दाखल

गुरुग्रामएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पकडलेल्या तरुण-तरुणींची गुरुग्राम पोलिसांनी केली सुटका, पार्टी आयोजकाचा शोध सुरू

कोविड काळात पार्ट्या करण्यास पूर्णत: बंदी असताना, शनिवारी रात्री बालियावसजवळ ऑफ रोड अँडव्हेंचर झोनमध्ये तरुण-तरुणींची पार्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन एसीपी व ग्वालपाडी पोलिसांनी छापा टाकून दारुच्या नशेत झिंगलेल्या २२ तरुण व ८ तरुणींना पकडले. तसेच कोणतीही परवानगी न घेता, पार्टीचे आयाेजन केल्याबद्दल आयोजकावर गुन्हे दाखल केले आहेत. नंतर अटक केलेल्या तरुण-तरुणींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आयोजकावर गुन्हा नोंदवून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.अायोजकाचा शोध घेण्यात येत आहे.

गुरुग्राममध्ये अनलॉक-३ सुरू असताना सर्व प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यास बंदी आहे. अशा काळात डीएलएफचे एसीपी करण गाेयल यांना गेल्या शनिवारी बालियावासजवळ तरुण-तरुणी पार्टीत नाचत असल्याचे समजले. गाेयल यांनी एका पथकाची नियुक्ती करून घटनास्थळी छापा टाकला. तेथे मोठ्या संख्येने तरुण व तरुणी नशेत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी बिअरचे तीन बॉक्स व विदेशी दारुचा एक बॉक्स आढळला. पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच तरुण -तरुणी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पोलिसांनी सर्वांना पकडले. या तरुणांची नंतर जामिनावर सुटका झाली. पार्टीचा आयोजक हर्ष गोसाई फरार झाला. त्याचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पार्टीसाठी परवानगी घेतलेली नव्हती
आरोपी हर्ष गोसाईने काेरोना संसर्ग काळात सरकारने जारी केलेले आदेश व मार्गदर्शक तत्वाचा अव्हेर करत खुलेआम दारुची पार्टी आयोजित केली. या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी खुलेआम दारुचे सेवन केले. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने जारी केलेले आदेश व मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासल्याचे दिसून आले. पोलिस प्रवक्ता सुभाष बोकन यांनी सांगितले, पार्टीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

गुरुग्रामचे पोलिस प्रवक्ता सुभाष बोकन यांनी सांगितले, गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यानंतर कोरोना संसर्ग पाहता येथे सर्व प्रकारच्या पार्ट्या, बार, पब, सिनेमागृहांंवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या पार्टीत खुलेआम दारू वाटप सुरू असल्याबद्दल अबकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...