आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. येथे श्रीलंका एअरलाइनच्या विमानातून प्रवास करणारे ३० आंतरराष्ट्रीय प्रवाशांना शुक्रवारी डोमेस्टिक अरायव्हलच्या बस गेटवर उतरवण्यात आले. विदेशी प्रवासी देशांतर्गत क्षेत्रात पोहोचल्याने सीआयएसएफ व इमिग्रेशनचे अधिकारी तत्काळ सावध झाले. याबाबत विमानतळाचे प्रवक्ते म्हणाले, ही एक मानवी चूक होती. माहिती मिळताच प्रवाशांना तत्काळ इमिग्रेशनसाठी इंटरनॅशनल अरायव्हलमध्ये आणण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.