आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Passengers Will Get Information About Vacant Berths After The Chart; Waitlist Holders Don't Even Need To Rely On TT

रेल्वे:चार्टनंतर प्रवाशांना मिळेल रिक्त बर्थची माहिती; वेटलिस्टधारकांना टीटीवर विसंबण्याची गरजही नाही

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार्ट तयार झाल्यानंतर कोणत्या श्रेणीच्या बोगीत किती बर्थ रिकाम्या आहेत, याची माहिती आता रेल्वेगाडीतील वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना मिळेल. रिकाम्या सीट्सची माहिती प्रवाशांना मोबाइलवर देण्यासाठी आयआरसीटीसी संकेतस्थळात नवे फीचर जोडण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. रेल्वेतील एका अधिकाऱ्यानुसार, ३ महिन्यांत ही व्यवस्था सुरू होऊ शकते.

आयआरसीटीसीवर तिकीट बुक करताना गेट ट्रेन चार्ट हा पर्याय निवडता येईल. त्यानंतर आयआरसीटीसी मेसेजची लिंक उघडल्यानंतर ज्या ट्रेनमधून प्रवास करत आहे त्यात कोणत्या श्रेणीत किती सीट रिकाम्या आहेत, ही माहिती मिळेल. लिंकवर जे प्रवासी आधी क्लिक करतील त्यांना उपलब्धतेनुसार सीट मिळेल. या सुविधेसाठी शुल्क आकारायचे झाल्यास ते ५ ते १० रुपयांपेक्षा जास्त नसेल. आतापर्यंत आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन गेट ट्रेन चार्टच्या माध्यमातून सीटची माहिती मिळवता येऊ शकत होती. प्रवाशांच्या मोबाइल क्रमांकावर रिकाम्या सीटचा तपशील पाठवण्याची सुविधा नव्हती. यामुळे वेटिंग तिकिटाचे प्रवासी टीटीवर अवलंबून राहत होते.

अशी काम करेल सिस्टिम

  • आयआरसीटीसीच्या संकेतस्थ‌ळावर तिकीट बुक करताना खाली उजवीकडे चार्ट/व्हॅकन्सीचा पर्याय निवडावा लागेल.
  • मग प्रवासाचा तपशील दिल्यानंतर गेट ट्रेन चार्टवर क्लिक करावे लागेल.
  • गेट अलर्ट व्हाया एसएमएस/मेल/व्हॉट्सअॅप हा पर्याय निवडावा लागेल.​​​​​​​
  • यानंतरही तिकीट कन्फर्म झाले नाही तर रिकामे बर्थ/सीट्सचे अलर्ट मोबाइलवर मिळू शकतील.
  • बुक नाऊचे ऑप्शन निवडल्यास उपलब्ध असेल तर सीट बुक होईल.