आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिन्यानंतर पाेलिसांना आली जाग:खलिस्तानी गटांचा पाेस्टरबाॅय अमृतपाल ‘फरार’, 78 अटकेत

चंदीगड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब पाेलिसांनी खलिस्तानी कटाचा नवा पाेस्टरबाॅय अमृतपाल सिंह याला ६ साथीदारांसह शनिवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. परंतु तो नंतर फरार झाल्याचे रात्री पोलिसांनी स्पष्ट केले. अमृतपालच्या संघटनेशी संबंधित ७८ जणांना अटक झाली. अमृतपाल ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आहे. गेल्या महिन्यात साथीदारांना साेडवण्यासाठी अमृतपालच्या चिथावणीवरून या संघटनेने अजनाला पाेलिस ठाण्यावर हल्ला केला हाेता. त्यानंतर एक महिन्यापासून पाेलिस बॅकफूटवर हाेती.

मात्र आता पाेलिसांनी पूर्ण तयारीने अमृतपालच्या गावाला घेराव घातला. जीपीएस लाेकेशनच्या साह्याने त्याचा पाठलाग केला. १०० हून जास्त वाहनांनी १११ किलाेमीटर पाठलाग केल्यानंतर अमृतपालची धरपकड झाली. राज्यातील परिस्थिती बिघडवण्याची शक्यता लक्षात घेऊन पंजाबमध्ये इंटरनेट व एसएमएस सेवा रविवारी दुपारपर्यंत बंद राहणार आहे. फाजिल्का जिल्ह्यास काही ठिकाणी कलम १४४ लागू केले. सीआरपीएफच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पाठलाग करतेवेळी अमृतपाल टीमची चिथावणी.. एका व्हिडिआेमध्ये अमृतपाल एसयूव्हीमध्ये बसलेला दिसताे. त्यात त्याचा एक साथीदार म्हणताे, भाई साहेबांच्या (अमृतपाल) मागे पाेलिस लागली आहे. सगळ्या लाेकांनी एकत्र यावे. मी तुम्हाला आमचे लाेकेशन पाठवताे. त्यानंतर या गाडीने प्रचंड वेग घेतला. परंतु पुढे पाठलाग करताना पाेलिसांनी त्या गाडीला घेराव घालून अमृतपालला अटक केली.

दहशतवादी भिंद्रनवाले अमृतपालचा आदर्श ३० वर्षीय अमृतपालकडे ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची सूत्रे गेल्या वर्षी साेपवली गेली. दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेच्या गावात त्याने संघटनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली हाेती. दीप सिद्धू हा या संघटनेचा आधीचा प्रमुख हाेता. ताे दुर्घटनेत मारला गेला. अमृतपाल दुबईत वाहतूक व्यवसाय करत हाेता. हा त्याचा वडिलाेपार्जित व्यवसाय हाेता. त्याच्या आजाेबांनी १९७० च्या दशकात कॅनडात वाहतूक व्यवसायास सुरुवात केली हाेती. हा व्यवसाय अचानकपणे गुंडाळून अमृतपाल पंजाबमध्ये परतला. अमृतपालने व्यवसाय बंद करून पंजाबमध्ये येणे सुरक्षा संस्थांना खटकणारी गाेष्ट आहे. त्याची पत्नी ब्रिटनची नागरिक आहे. खलिस्तानी संघटनांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम आयएसआयदेखील करते. ‘वारिस पंजाब दे’ च्या अजेंड्यात अविभाजित पंजाब म्हणजे पंजाब व्यतिरिक्त पाकिस्तानी पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेशही आहे.

बातम्या आणखी आहेत...