आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Patanjali Drug Trial Dispute, No Permission For Ayurvedic Drug Test On Corona Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदुर:वादात अडकला पतंजलीचा प्रस्ताव, आयुर्वेदिक औषधाच्या क्लिनीकल ट्रायलला प्रशासनाचा नकार

इंदुरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंदुरमध्ये क्लिनिकल ट्रायलच्या विचारात होती कंपनी, बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती

पतंजलीकडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या ट्रायलसाठीची परवानगी आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर रद्द करण्यात आली. क्लिनीकल ट्रायलसंबंधी बाबा रामदेव यांनी सीएम शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली होती. तर, पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी इंदुरचे कलेक्टर मनीष सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

कलेक्टरने याबाबत स्पष्ट केले की, मेडिकल कॉलेजकडून मिळालेल्या अर्जामध्ये औषध रुग्णाला काढ्याच्या रुपात देण्याबाबत सांगण्यात आले होते, ट्रायलची कोणतीच परवानगी देण्यात आली नव्हती. कलेक्टरांनी सांगितल्यानुसार प्रशासनाने औषधाच्या ट्रायलची परवानगी दिली नव्हती. आयुर्वेदिक किंवा होम्योपॅथिक औषधांचे क्लीनिक ट्रायल नसतात. अॅलोपेथिकचे ट्रायल असतात, ज्याचा प्रोटोकॉल आणि प्रक्रिया आहे. या सर्व तथ्यांना ध्यानात घेत, कंपनीच्या प्रस्तावाला रद्द करण्यात आले.

पतंजलीचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता

एमजीएम मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर ज्योती बिंदल यांचे म्हणने आहे की, पतंजलीच्या अर्जात औषध कोरोना रुग्णांना देणे आणि परिणामाचा आढावा घेण्यासंबंधी सांगण्यात आले होते, यामुळेच हा प्रस्ताव प्रमुख सचिव मप्र शासनाला पाठवण्यात आला होता.

पतंजलीचा दावा- हे आयुर्वेदिक औषध खाऊन अनेक रुग्ण ठीक झाले आहेत

पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात जयपूरसह इतर काही ठिकाणी केलेल्या चाचण्याचांचा डेटासह हा आचार्यांनी दावा केला होता की, या औषधामुळे कोरोनाला संपवण्यास मदत मिळते आणि यामुळे अनेक रुग्ण ठीक झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...