आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pathankot Beggar's Charity, Beggars Felt 3 Thousand Masks And Ration Food To 100 Poor Families

दिव्य मराठी विशेष:पठाणकोटच्या भिकाऱ्याचे दातृत्व, भीक मागून वाटले 3 हजार मास्क आणि 100 गरीब कुटुंबांना रेशन धान्य

पठाणकोट (पंजाब)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांग राजू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘मन की बात’मध्ये दिव्यांग राजूचे कौतुक
  • सहृदयता... लोक मला मदत देतात, मी दुसऱ्यांना मदत करतो
Advertisement
Advertisement

सव्वा महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी पठाणकोटच्या दोन लोकांना प्रेरणास्रोत असल्याचे सांगून त्यांचे जाहीर कौतुक केले. २४ एप्रिल रोजी येथील तरुण सरपंच पल्लवी ठाकूर यांचे कौतुक केले होते. त्यानंतर रविवारी केलेल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान  मोदी यांनी प्रेरणास्रोत म्हणून पठाणकोटच्या दिव्यांग राजूचे कौतुक केले होते. तो  पोलिअोग्रस्त असून गेल्या ३५ वर्षांपासून भीक मागतो. त्याने आपल्या कमाईतून गरीब मुलींच्या लग्नात मदत केली. लॉकडाऊनमध्ये ३००० मास्क व  १०० कुटुंबांना रेशन दिले. 

सहृदयता... लोक मला मदत देतात, मी दुसऱ्यांना मदत करतो

राजू सांगतो, लहान असल्यापासून तो पोलिअोग्रस्त आहे. वयाच्या दहाव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरपले. तो रस्त्यावर आला. दिव्यांग असल्याने त्याला कामावर कोणी घेत नव्हते. लाचार झाल्याने त्याने भीक मागणे सुरू केले. तो अविवाहितच राहिला. त्याला दोन भाऊ आहेत. परंतु तो वेगळा राहतो. शेजारचे त्याला जेवण तयार करून देतात. त्याला दररोज ५०० ते ७०० रुपये भीक मिळते. उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे वगळता त्याने इतर उत्पन्न लोकांसाठी खर्च करतो. मंदिराला दान देणे, गरीब मुलींच्या लग्नात मदत करणे, दरवर्षी तो भंडारा करतो. आतापर्यंत त्याने २२ गरीब मुलींच्या लग्नात रेशन व इतर मदत दिली आहे. ७ जून रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नात ११०० रुपये, ५० किलो तांदूळ व एक पंखा अशा वस्तू भेटीदाखल दिल्या. लोक माझी मदत करतात. मी दुसऱ्यांना मदत करतो. भीक मागण्याची  लाज वाटते. पण लोकांची मदत करणे चांगले वाटते, असे तो म्हणतो. 

रविवारी ‘मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी  म्हणाले, पठाणकोटच्या राजूने ३००० मास्क वाटले आणि १०० कुटुंबांना रेशन दिले. 

Advertisement
0