आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Patiala Court Grants Interim Bail To Jacqueline Fernandes In Money Laundering Case

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला जामीन:कुणी ओळखू नये म्हणून वकिलांच्या वेशात कोर्टात पोहोचली; 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तब्बल 200 कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 26 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीला कुणी ओळखू नये यासाठी जॅकलिन वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचली होती. कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी खंडणी प्रकरणात जॅकलिन महत्त्वाची साक्षीदार आहे. नुकतीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिची या प्रकरणात 8 तास चौकशी केली होती.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आज 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पतियाळा कोर्टात हजर झाली होती. न्यायालयाने जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने अभिनेत्रीला समन्स बजावले होते. यानंतर अभिनेत्रीच्या वकिलांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला आणि आता कोर्टाने अभिनेत्रीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

कोर्टाने ईडीला उत्तर मागवले

मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जामीन अर्जावर ईडीकडून उत्तर मागितले आहे. तोपर्यंत अभिनेत्रीचा नियमित जामीन न्यायालयात प्रलंबित राहणार आहे. जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून कोर्टाने अभिनेत्रीला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुमारे 8 तास जॅकलिनची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान जॅकलिन काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळताना दिसली. जॅकलिन व्यतिरिक्त EOW ने पिंकी इराणीलाही बोलावले होते. पिंकी इराणीने जॅकलिनला सुकेशशी भेटवण्यात मदत केली. मात्र, चौकशीत दोघींचे जबाब जुळले नाहीत.

यापूर्वी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, लिपाक्षीने सुकेशकडून 3 कोटी रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. 21 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) लिपाक्षीची सुमारे 7 तास चौकशी केली.

आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिनला अनेक भेटवस्तू दिल्याचे उघड झाले आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिनला अनेक भेटवस्तू दिल्याचे उघड झाले आहे.

डिझायनरने 3 कोटी रुपये घेतले

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, लिपाक्षीने सांगितले की, सुकेश चंद्रशेखरने तिला जॅकलिनला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी 3 कोटी रुपये दिले होते. मात्र, डिझायनरने खुलासा केला की, जॅकलीनने सुकेशला अटक केल्यानंतर त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते.

सुकेशनेच जॅकलिनला 52 लाख रुपयांचा घोडा गिफ्ट केल्याचा आरोप आहे.
सुकेशनेच जॅकलिनला 52 लाख रुपयांचा घोडा गिफ्ट केल्याचा आरोप आहे.

लिपाक्षी जॅकलिनच्या आवडी-निवडी सांगायची

EOWच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, "जॅकलिनचे आवडते ब्रँड आणि तिला कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात याबद्दल जाणून घेण्यासाठी सुकेशने गेल्या वर्षी लिपाक्षीशी संपर्क साधला होता. तिने डिझायनरकडून सूचना घेतल्या आणि जॅकलीनलाही दिल्या. 3 कोटी रुपयेही दिले होते. लिपाक्षीने चंद्रशेखरने दिलेले पैसे जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले होते."

जॅकलिनला सुकेशच्या फसवणुकीची कल्पना होती

जॅकलीन फर्नांडिस अडचणीत तेव्हा आली जेव्हा ईडीला तिचे नाव 215 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आढळले. आरोपी सुकेशच्या खंडणीची माहिती जॅकलिनला होती, असा केंद्रीय एजन्सीचा विश्वास आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, सुकेशसोबतच्या जॅकलिनच्या संबंधांमुळे तिच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही फायदा झाला आहे. मात्र, जॅकलिनने नंतर सांगितले की, तिच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत.

सुकेशने जॅकलिनला 9-9 लाख रुपयांच्या चार पर्शियन कॅट गिफ्ट केल्याची माहिती समोर आली होती.
सुकेशने जॅकलिनला 9-9 लाख रुपयांच्या चार पर्शियन कॅट गिफ्ट केल्याची माहिती समोर आली होती.

काय आहे हे प्रकरण?

ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून खंडणी उकळली होती. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.