आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Patidar Leader Hardik Patel Joins BJP | Hardik Political Career Profile | Former Congress Leader

हार्दिक पटेल यांची भाजपत एंट्री:कोबा ते कमलम काढला रोड शो, 12.39च्या विजय मुहूर्तावर पक्षात झाले सामील

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे प्रसिद्ध पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी काँग्रेस नेत्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनी प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकने कोबा परिसर ते भाजप कार्यालय 'कमलम' असा रोड शो केला, ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित होते. यानंतर त्यांनी 12.39च्या विजय मुहूर्तावर कमलममध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भगवा धारण केला.

प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी श्वेता ब्रह्मभट्ट यांना भाजपचे सदस्यत्व दिले.
प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी श्वेता ब्रह्मभट्ट यांना भाजपचे सदस्यत्व दिले.

कार्यक्रमादरम्यान गोंधळाची होती शंका

यासोबतच त्यांच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही गडबड होऊ नये यासाठी 'कमलम'भोवती तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सर्व टीमला सूचना देण्यात आल्या आहेत की, सोशल मीडियावर अशी कोणतीही टिप्पणी करू नये, ज्यामुळे वादाची परिस्थिती निर्माण होईल.

भाजपमध्ये येण्यापूर्वी पूजापाठ

पक्षात येण्यापूर्वी हार्दिक यांनी एक पोस्टर जारी केले. पोस्टरनुसार भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम सकाळी होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी निवासस्थानी दुर्गा पठण केले. दुर्गापूजेनंतर हार्दिक स्वामीनारायण येथे जाऊन गाईची पूजा केली.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी दुर्गापूजा केली.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी दुर्गापूजा केली.

हार्दिक म्हणाले - पदाचा लोभ नाही

काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल म्हणाले- मी आजपर्यंत पदाच्या लालसेपोटी कुठेही मागणी केलेली नाही. मी काँग्रेसही काम मागून सोडली आणि भाजपमध्येही कामाच्या व्याख्येत सामील होत आहे. कमकुवत लोक पदाबद्दल चिंता करतात. बलवान लोक कधीही याची चिंता करत नाहीत.

17 मे रोजी राजीनामा

दीर्घकाळापासून काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या हार्दिक यांनी 17 मे रोजी ट्विटरवरून राजीनामा जाहीर केला होता. त्यांनी राहुल गांधींवर अनेक आरोप केले. राजीनाम्यानंतर ते सातत्याने भाजपच्या कार्याचे कौतुक करत होते आणि स्वतःला हिंदुत्वाचे समर्थकही म्हणवत होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती.

प्रदेश काँग्रेसबद्दल नाराजी

हार्दिक यांची काँग्रेसबद्दलची नाराजी आता कोणापासून लपून राहिलेली नाही. याआधीही त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. एका निवेदनात त्यांनी असेही म्हटले होते की, काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था अशी झाली आहे की, नव्या वराची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र, आपण राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यावर नाराज नसून प्रदेश नेतृत्वावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

2014 पासून सुरू केले होते आंदोलन

हार्दिक पटेल 2014 मध्ये सरदार पटेल गटात सामील झाले आणि नंतर पाटीदार आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. एकप्रकारे हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होता. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली. कुर्मी, पाटीदार आणि गुज्जर समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात, हा त्यामागचा हेतू होता. या आंदोलनादरम्यान हार्दिक पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.

हार्दिक यांच्यावरही झाले अनेक आरोप

काँग्रेसमध्ये असताना हार्दिक यांच्यावर अनेक आरोप झाले. पाटीदार नेत्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय त्यांचे एक सीडी स्कँडलही खूप गाजले होते. सीडी कांडात ते एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते. याप्रकरणी हार्दिक यांनी स्पष्टीकरण दिले होते की, मी तरुण आहे आणि हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे.

बातम्या आणखी आहेत...