आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाजिरवाणे कृत्य:दिल्लीतील कोरोना क्वारेंटाइन सेंटरमध्ये जमाती रुग्णांनी लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या, आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावरही थुंकले, रुग्णांविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमातींच्या गैरवर्तनाच्या घटना दिल्लीतील द्वारका आणि बक्करवाला सेंटरमध्ये घडल्या

क्वारेंटाइन सेंटरमध्ये दाखल असलेल्या तब्लीगी जमातच्या रुग्णांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दिल्लीच्या द्वारका परिसरातील क्वारेंटाइट सेंटरमध्ये काही जमाती रुग्णांना लघवीने भरलेल्या बाटल्या टाकल्या, तर बक्करवाला सेंटरमध्ये एका रुग्णाने मेडिकल स्टाफच्या अंगावर थुंकले. तक्रारीनंतर दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. द्वारका सेक्टर-16 मध्ये 198 आणि बक्करवालामध्ये 120 जमाती क्वारेंटाइन आहेत. द्वारका सेक्टर 16 च्या क्वारेंटाइट सेंटरमध्ये ड्यूटीवर तैनात सिविल डिफेंसच्या स्टाफला पंप हाउसच्या छतावर तीन बाटल्या सापडल्या, त्यात लघवी होती.  या घटनेची तक्रार सेंटर इंचार्जकडून मिळाल्यानंतर द्वारका नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. परंतू, या घटनेचे फोटो अद्याप समोर आले नाहीत.

कोरोनाचे दिल्लीत 4 तासात 93 नवीन प्रकरणे, सर्व मरकजशी संबंधित
दिल्लीत कोरोना संक्रमणाची प्रकरणे वाढतच आहेत. सध्या दिल्लीत 669 कोरोनाग्रस्त सापडले आहेत, यापेकी 426 निजामुद्दीन मरकजशी संबंधित लोक आहेत. तसेच, परदेशातून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना झालेल्यांची संख्या 214 झाली आहे. बुधवारी दिल्ली सरकारचे डॉयरेक्टारेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसेसकडून जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार मागील 24 तासात कोरोनाची 93 नवीन प्रकरणे आढळली आहेत. हे सर्व निजामुद्दीन मरकजशी संबंधित आहेत. तसेच, 20 रुग्ण आतापर्यंत ठीक झाले आहेत.

1052 रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये
दिल्ली सरकारच्या वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये 1052 रुग्ण दाखल आहेत. यात 558 कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर 28  रुग्ण आयसीयू आणि 6 वेंटिलेटरवर आहेत. 15 रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवले आहे. एलएनजेपीमध्ये 121, आरजीएसएसएच 97, जीटीबी 33, डीडीयू 33, बीएसए 10, आरएमएलमध्ये 22 रुग्ण दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...