आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Patients With Mild Symptoms Will Be Discharged In 10 Days; No Test Is Required Before Discharge, 7 Days Stay In Home Isolation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर नवीन धोरण:हलकी लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांना 10 दिवसांत मिळेल डिस्चार्ज; सुटीपूर्वी आवश्यक नाही चाचणी, 7 दिवस काढावे लागतील होम आयसोलेशनमध्ये

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताप असल्यास डिस्चार्ज नाही, 10 दिवसांत असे केले जातील कोरोनाग्रस्तांवर उपचार

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्तांना रुग्णालयातून डिस्चार्जसाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, हलकी लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना अवघ्या 10 दिवसांत रुग्णालयातून घरी सोडले जाईल. सुधारित नियमानुसार, खूप हलकी, हलकी आणि प्राथमिक लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना कोव्हिड केअर फॅसिलिटीमध्ये दाखल केले जाणार आहे. त्यांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचे लेव्हल नियमित तपासले जाईल. अशा रुग्णांना 10 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. परंतु, डिस्चार्ज देत असताना त्यांना ताप असू नये. विशेष म्हणजे, अशा रुग्णांना ताप नसल्यास डिस्चार्ज देताना कोरोना टेस्ट करावे लागणार नाही. तरीही त्यांना घरातच 7 दिवसांसाठी विलगीकृत राहावे लागणार आहे.

10 दिवसांत असा केला जाणार उपचार

कोरोनाची सरासरी (हलकी लक्षणे) असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड असलेल्या डेडिकेटेट कोव्हिड हेल्ट सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. या ठिकाणी त्यांच्या शरीराच्या तापमानाची आणि ऑक्सिजनची दैनंदिन नोंद केली जाईल. शरीराचे तापमान 3 दिवसांत सामान्य झाल्यास आणि त्यांचे 4 दिवसांपर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल 95% पेक्षा अधिक राहिल्यास 10 दिवसांत डिस्चार्ज दिला जाऊ शकेल. परंतु, डिस्चार्ज देताना त्यांना ताप किंवा श्वास घेण्यात कुठलीही समस्या येऊ नये. अन्यथा मॉडरेट लक्षणाच्या रुग्णाला सुद्धा अशात डिस्चार्ज दिला जाणार नाही. ज्या रुग्णांची ताप 3 दिवसांनंतरही उतरत नसेल. ज्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे. त्यांना पूर्णपणे बरे होईपर्यंत रुग्णालयातच राहावे लागेल. त्यानंतरही डिस्चार्ज देत असताना सलग तीन दिवस रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण नियमित असायला हवे.

बातम्या आणखी आहेत...