आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुन्न करणारा व्हिडिओ:आईचा झाला होता मृत्यू, तरी तिच्या मृतदेहावर टाकलेल्या चादरीसोबत लपंडाव खेळत होता चिमुकला; या उमेदीने की ती आता उठेल...

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातवरुन आली होती महिला, मुजफ्फरपुर स्टेशनला पोहचण्यापूर्वीच ट्रेनमध्ये अन्न-पाण्याविना झाला मृत्यू

मुजफ्फरपूरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला मृत आईच्या शरीरावर टाकलेल्या चादरीसोबत खेळताना दिसत आहे. चिमुकल्याला माहित नाही की, त्याची आई आता या जगात नाही. त्याला माहित नाही की, आईच्या अंगावरील चादर काढली, तरी आई उठणार नाही. 

ही महिला गुजरातवरुन आली होती. रविवार(दि. 25) ती ट्रेनमध्ये बसली होती, पण अन्न-पाणी न मिळाल्यामुळे तिची तब्येत खराब झाली. सोमवारी ट्रेन मुजफ्फरपुरला पोहचण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला. स्टेशनवर पोहचल्यावर महिलेचा मृतदेह स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आला, तेव्हा तिचा अडीच वर्षांचा चिमुकला आपल्या आईशेजारी खेळत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला.

चार वर्षीय मुलाचा मृत्यू

देशभरातून प्रवासी मजूर स्पेशल ट्रेनने बिहारला परत येत आहेत. दररोज 100 पेक्षा जास्त ट्रेन प्रवाशांना घेऊन बिहारमध्ये येत आहे. दरम्यान, अनेक ट्रेनमध्ये अन्न-पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यातच मुजफ्फरपूर स्टेशनवरच सोमवारी चार वर्षीय इरशादचा मृत्यू झाला. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील तुलाराम घाटचा रहिवासी मो. पिंटू शनिवारी दिल्लीवरुन पटनाला येत होता. सोमवारी सकाळी मुजफ्फरपुर जंक्शनला पोहचले. त्यानंतर मुजफ्फरपूरमधून बेतियाच्या ट्रेनमध्ये चढताना इरशादचा मृत्यू झाला. पिंटू म्हणाले की, गर्मी आणि अन्न-पाणी न मिळाल्याने इरशादचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...