आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लासवरून परतणाऱ्या विद्यार्थीनीवर गॅंगरेप:पाटणामधील धक्कादायक घटना; मित्रानेच चौघांसमवेत केले कृत्य, 5 जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारची राजधानी पाटणामध्ये​​​​​​ एक धक्कादायक लाजिरवाणी ​घटना झाली आहे. कोचिंग क्लासवरून परतणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तीने आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून ही कृत्य केले. त्यापैकी एक जण रिक्षाचालक आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. हल्लेखोरांनी त्याला मंदिराजवळ सोडून पळ काढला. पीडिता रात्रभर त्या ठिकाणीच पडून होती. पीडितेच्या जबाबावरून पाटणाच्या बायपास पोलीस ठाण्यात 5 जणांविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बायपास पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील बायपास पोलिस स्टेशनच्या सती चौराजवळ 5 आरोपींनी कोचिंगवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण केले. तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत गोलू कुमार, मुकेश कुमार, सुग्रीव कुमार, प्रमोद कुमार यांच्यासह रिक्षाचालकाचा समावेश आहे. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी बायपास पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

सोमवारी सायंकाळची घटना

सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

आज जबाब नोंदवला जाईल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता गोलू कुमार नामक आरोपीला आधीपासूनच ओळखते. त्याने हाक मारल्यावर ती गेली. त्यानंतर गोलूने त्याच्या चार मित्रांना बोलावले. तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मेडिकल झाल्यानंतर मुलीला कुटुंबासह पाठवण्यात आले आहे. बुधवारी मुलीला न्यायालयात नेले जाणार आहे. तर तिचा जबाब नोंदविला जाणार आहे.

पाटणा शहराचे एएसपी अमित रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थिनीच्या जबानीच्या आधारे 5 तरुणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

रिक्षाचालकाला केले अटक, अन्य अद्याप फरार

पाटणाचे एएसपी अमित रंजन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. .

बातम्या आणखी आहेत...