आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रत रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट:पाटणा हाय कोर्टाने 3 राज्यांच्या पोलिस महासंचालकांना दिले अटक करण्याचे आदेश

पाटणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये परत न केल्याप्रकरणी सहारा इंडियाचे मालक सुब्रत रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे. पाटणा हाय कोर्टाने बिहार, दिल्ली व उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) सुब्रत रॉय यांना अटक करण्याचे आदेश दिलेत. हाय कोर्टाने एका दिवसापूर्वीच सहाराश्रींना हजर होण्याचे आदेश दिले होते. पण, ते हजर झाले नाही.

सहाराच्या वकिलांनी हाय कोर्टापुढे सुब्रत रॉय यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यावर न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी रॉय कोर्टात हजर राहू शकत नाहीत, असा कोणताही आजार त्यांना नाही असे ठणकावून सांगितले.

गुंतवणूकदारांनी हाय कोर्टात पैसे परत करण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सुब्रत रॉय यांना 12 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, रॉय यांनी अंतरिम अर्ज सादर करुन पेशीत सूट मागितली होती. कोर्टाने गुरुवारी ती फेटाळून लावली. सहारा इंडियाच्या मालकांना कोणत्याही स्थितीत शुक्रवारी सकाळी 10.30 वा. हजर रहावे लागेल. ते आले नाही, तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, असा इशारा कोर्टाने या प्रकरणी दिला होता.

हाय कोर्टाने केली कठोर टिपणी

न्यायमूर्ती संदीप कुमार म्हणाले होते की, सुब्रत रॉय कोर्टाहून मोठे नाहीत. आज हजर न होण्याची त्यांनी फार मोठी चूक केली. कोर्टात न हजर होणारे सुब्रत रॉय कोण आहेत? त्यांना कोर्टात यावेच लागेल.

आजारपणाचे कारण देत मागितली होती सूट

सुब्रत रॉय यांच्या वकिलांनी न्यायालयात अंतरिम अर्ज सादर केला होता. त्यात त्यांनी हाय कोर्टाला विनंती केली होती. ते म्हणाले होते -"माझे वय 74 वर्षांचे आहे. जानेवारी महिन्यात माझ्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. माझी आजही प्रकृती चांगली नाही . त्यामुळे कोर्टात व्यक्तिशः हजर होण्यापासून मला सूट दिली जावी. मला व्हर्च्युअल पद्धतीने कोर्टात सादर होण्याची परवानगी दिली जावी."

"गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी माझ्याकडे विस्तृत योजना आहे. विशेषतः तत्काळ 5 कोटी रुपये जमा करण्याचीही माझी तयारी आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही एक याचिका न्यायप्रविष्ट आहे," असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...