आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​ओडिशाच्या नव्या कॅबिनेटचा शपथविधी:निवडणुकीपूर्वी पटनायकांनी बदलले अर्धे मंत्रिमंडळ; महिला मंत्र्यांचा टक्का वाढला

भुवनेश्वर ​​​​​​​एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा रविवारी दुपारी शपथविधी झाला. त्यात 21 मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. 21 पैकी 10 नवे चेहरे आहेत. मागील कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री असलेल्या जगन्नाथ सरकार यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली. ओडिशात मार्च 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या निवडणुकीपूर्वी पटनायकांनी आपले अर्धे मंत्रिमंडळ बदलले आहे.

कॅबिनेटमध्ये महिलांना प्राधान्य

नवीन पटनायक यांनी नव्या कॅबिनेटमध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे. गत मंत्रिमंडळात केवळ 3 महिला मंत्री होत्या. पण, नव्या मंत्रिमंडळात महिला कोट्यातून 5 मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. कॅबिनेट विस्तारानंतर खातेवाटप होईल. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अंतराने जिंकणाऱ्या रीता साहू यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

ओडिशाच्या नव्या कॅबिनेटमध्ये 21 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यातील 13 कॅबिनेट व 8 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.
ओडिशाच्या नव्या कॅबिनेटमध्ये 21 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यातील 13 कॅबिनेट व 8 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.

केसरी व जेना सारखे बडे मंत्री बाहेर

कॅबिनेट विस्तारात विक्रम केसरी व प्रताप जेना सारख्या दिग्गज नेत्यांना स्थान मिळाले नाही. या दोघांनाही परफॉर्मंसच्या आधारावर हटवण्यात आले आहे. केसरी वन व जेना पंचायत राज मंत्री होते. याशिवाय, आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांनाही कॅबिनेटमध्ये जागा मिळाली नाही.

2024 च्या निवडणुकीवर लक्ष

पटनायक सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मजबूत करण्यासाठी हा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. पटनायक मागील 22 वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत.

पटनायकांना राजकारणात 25 वर्ष पूर्ण

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना राजकारणात 25 वर्ष पूर्ण झालेत. ते 1997 साली अस्का लोकसभा मतदार संघातून सर्वप्रथम निवडून आले होते. त्यांचे वडील बीजू पटनायक ओडिशाचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्यानंतर पटनायकांनी बीजू जनता दलाची स्थापना केली. तेव्हापासून ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

नवीन पटनायक यांच्या नेतृत्वात 2000, 2004, 2009, 2014 व 2019 मध्ये सलग 5 व्या बीजू जनता दलाने ओडिशात सरकार स्थापन केले आहे. ------------------------

बातम्या आणखी आहेत...