आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहबूबा मुफ्तींचा केंद्रावर निशाणा:आईची ईडीने 3 तास चौकशी केली तर भडकल्या महबूबा मुफ्ती; केंद्राला अफगाणिस्तानसारख्या परिणामांची दिली धमकी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेहबूबा यांनी केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचे आणि जम्मू -काश्मीरच्या लोकांशी चर्चा करण्याचे आवाहनही केले.

जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कुलगाममध्ये त्या म्हणाल्या की तुमच्या शेजाऱ्याकडे म्हणजे अफगाणिस्तानकडे बघा. जिथून अमेरिका आपला गाशा गुंडाळून बांधून परत जाण्यास भाग पडला. त्या म्हणाल्या की, काश्मिरी कमकुवत नाहीत, पण ते खूप शूर आणि धीर धरणारे आहेत. ज्या दिवशी संयमाची भिंत तुटेल, तुम्ही पराभूत व्हाल.

खरेतर मेहबूबा मुफ्तींच्या आई गुलशन नजीर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. तपास यंत्रणेने नजीर यांची 3 तास चौकशी केली, त्यानंतर मेहबूबा भडकल्या आणि त्यांनी हे वक्तव्य दिले. मेहबूबा यांनी केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचे आणि जम्मू -काश्मीरच्या लोकांशी चर्चा करण्याचे आवाहनही केले.

मेहबुबा मुफ्ती एका व्यासपीठावरून बोलत असताना म्हणाल्या की, 'मी सातत्याने सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका? आता तरी सुधारा, शेजारी काय होत आहे ते पाहा, एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून आपला गाशा गुंडाळून जावे लागले. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकार वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटले आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचे चित्र तुम्ही खराब केलेले आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेले आहेत. ही चूक सुधारा नाहीतर फार उशीर होईल.'

बातम्या आणखी आहेत...