आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Peace Like An Office cabin In 'Vande Bharat' With A Speed Of 180! 100 New Vande Bharat Trains In Two Years

ग्राउंड रिपोर्ट:180 चा वेग असणाऱ्या ‘वंदे भारत’मध्ये ऑफिस-केबिनसारखी शांतता! दोन वर्षांत 100 नवीन वंदे भारत ट्रेन

भंवर जांगिड. इंटिग्रल कोच फॅक्ट्री पेरम्बूर (चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेरम्बूरच्या इंटिग्रल कोच फॅक्ट्रीत (आयसीएफ) वंदे भारत ट्रेनचे १०० हून जास्त कोच तयार होणार आहेत. चेअरनंतर आता स्लीपर कोच ट्रेनदेखील रुळावर धावू लागतील. त्याची डिझाइन तयार आहे. केवळ बोर्ड मंजुरीची प्रतीक्षा आहे. पुढील दोन वर्षांत ११५ वंदे भारत ट्रेन बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात ७५ आसनी व ४० स्लीपरचा समावेश आहे. आयसीएफचे व्यवस्थापकीय संचालक व प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर एस. श्रीनिवासन म्हणाले, सगळ्या ट्रेन दोन वर्षांत तयार होतील. एप्रिलनंतर त्यांची निर्मिती कपूरथळा व रायबरेलीमध्ये होऊ लागेल. तूर्त या कारखान्यात सर्वात आधी सुट्या भागांच्या पार्सलचे ढिगारे आहेत. त्यावरून आत वेगाने काम सुरू असल्याचे दिसते. राेज सकाळी ७.३० ते रात्री २.०० वाजेपर्यंत शेकडो अभियंते-तंत्रज्ञ या कामात व्यग्र आहेत. फायनल टेस्टिंग युनिटमध्ये एक पूर्ण रॅक तयार आहे. तेथे रेल्वेचालकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.

नवे फीचर
चालक ब्रेक विसरल्यास सेन्सरमार्फत ट्रेन थांबेल

{प्रवासादरम्यान चालक ब्रेक लावायचे विसरल्यास सेन्सरद्वारे हे काम होईल. मानवीय चुकीची शक्यताही कमी.
{इमर्जन्सी टॉक सिस्टिमने प्रवासी चालकाशी थेट बोलू शकतात. आधीच्या कोचबाहेर दोन पॉइंट होते. आता ४ पॉइंट.
{ताशी १८० वेगाची तपासणी झाली आहे. सध्या १६० वर धावू लागलीय. परंतु रुळामुळे वेग ताशी १३० एवढा आहे.
{चालक केबिनमधून कोच, प्लॅटफॉर्मवर नजर. सर्व कोचमध्ये ६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत.
{धावत्या ट्रेनमध्ये ऑफिस चेंबरसारखी शांतता. आवाज ७० डेसिबलहून कमी.

तीन गोष्टी वंदे भारत ट्रेनला सेन्स ऑफ प्राइड बनवतात
1 पूर्णपणे मेक इंडिया. काही भाग तर बाहेरून खरेदी करावेच लागतात, परंतु डिझाइन व तंत्रज्ञान भारताचेच आहे.
2 चार वर्षांपासून अविरतपणे सेवा. युरोप-जपानमध्ये रिप्लेसमेंट व दुरुस्तीदरम्यान ४-५ ट्रेन ट्रेन राखीव असतात.
3 आयसीफमध्ये ट्रेनचा खर्च युरोपीय व जपानी ट्रेनच्या तुलनेत ६० टक्के कमी. परदेशात ट्रेन ३ वर्षांत तयार होते. येथे १८ महिन्यांत तयार.

बातम्या आणखी आहेत...