आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pegasus Row: Supreme Court To Hear Batch Of Pleas For Independent Probe; News And Live Updates

पेगाससवर सुप्रीम कोर्टात सुनावणी:जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय; एसआयटी चौकशी करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पायवेअर का खरेदी केली - कपिल सिब्बल

एकीकडे संसदेत पेगासस प्रकरणावरुन गदारोळ सुर आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित 9 अर्जांवर सुनावणी करीत आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. सुनावणीदरम्यान, जर हे रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा आहे असे न्यायमूर्ती एन. व्ही. रमना यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम हेरगिरीचा अहवाल 2019 मध्ये समोर आला होता. परंतु, यावर अजून कोणीही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला की नाही याबद्दल माहित नाही.

ही याचिका पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांनी दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, पेगासस हे एक वाईट तंत्रज्ञान असून ते नकळत आपल्या जीवनात प्रवेश करते. यामुळे आपली गोपनीयता, सन्मान आणि स्वातंत्र्यांच्या मुल्ल्यांवर हल्ला होतो. हे स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांनाच विकल्या जाते असे ते यावेळी म्हणाले.

स्पायवेअर का खरेदी केली - कपिल सिब्बल
केंद्र सरकारने स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकार, घटनात्मक संस्था, न्यायालयीन अधिकारी आणि अगदी शिक्षणतज्ज्ञ यांना टारगेट केले जात आहे. अशा अशा परिस्थितीत सरकारने स्पायवेअर का खरेदी केले? याचे उत्तर द्यावे अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.

पेगासस म्हणजे काय?

  • पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरवर जाते. हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी NSO ग्रुपने बनवले आहे.
  • या यादीमध्ये भारतात कोणाची नावे समाविष्ट आहेत? वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत 40 भारतीय पत्रकार, तीन प्रमुख विरोधी नेते, मोदी सरकारमधील दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ता दुजारा मिळाला आहे. पण त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही.
  • पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...