आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pegasus Snooping Case| Supreme Court To Hear Plea Asking For SIT Probe On 5 August; News And Live Updates

पेगासस हेरगिरी प्रकरण:सर्वोच्च न्यायालयात 5 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी; याचिकाकर्त्याने SIT चौकशी करण्याची केली होती मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी - कपिल सिब्बल

पेगासस हेरगिरी प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल की नाही यावर सर्वोच्च न्यायालय 5 ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ प्रत्रकार एन राम आणि शशि कुमार यांनी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष पेगासस प्रकरणावरुन सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे सुनावणी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीसाठी 5 ऑगस्ट ही तारीख दिली आहे.

लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी - कपिल सिब्बल
पेगासस हेरगिरी प्रकरणावरील याचिकेची लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या खंडपीठाकडे केली आहे. हा वाद बराच पसरलेला असून भारतासह जगभरात याची चर्चा आहे. सिब्बल पुढे म्हणाले की, देशातील नागरिक, विरोधी पक्षांचे नेते आणि पत्रकार यांच्यावर पाळत ठेवणे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे ते यावेळी म्हणाले.

SC न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची मागणी
पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा विद्यामान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात केली जावी. केंद्राने हे सांगण्यास सांगितले पाहिजे की सरकार किंवा त्याच्या कोणत्याही एजन्सीने हेरगिरीसाठी पेगासस स्पायवेअरचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर केला आहे का? पेगासस स्पायवेअरचा परवाना घेण्यात आला होता का?

बातम्या आणखी आहेत...