आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Pegasus Spyware Hearing Update; Supreme Court 10 Days' Time To Government; News And Live Updates

पेगासस हेरगिरी प्रकरण:आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकार स्थापन करणार समिती; सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरणातील नियुक्तीसाठी 10 दिवसांची दिली मुदत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • याचिकाकर्त्यांना शिस्तबद्ध राहण्याच्या दिल्या सूचना

पेगासस हेरगिरी प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्र सरकारने संबंधित प्रकरणावर न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने ही न्यायाधिकरणातील नियुक्तीसाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.

याचिकाकर्त्यांनी पेगासस प्रकरणावरुन सरकारवर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. पत्रकार, राजकारणी आणि कर्मचाऱ्यांवर स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरीचे दावे अनुमानांवर आधारित असल्याचे याचिकेत म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी दोन पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणाविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी ही चौकशी करण्यात येणार असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांना शिस्तबद्ध राहण्याच्या दिल्या सूचना
पेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी केली होती. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचे उत्तर नोंदवण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. त्यानंतर ही सुनावणी 16 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी सीजेआय एन. व्ही. रमना यांनी याचिकाकर्त्यांना सोशल मीडिया आणि वेबसाइटवर या विषयी सुरू असलेल्या वादामुळे शिस्तबद्ध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याचिकाकर्त्यांची मागणी काय आहे?
पेगासस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. सरकार किंवा त्याच्या कोणत्याही एजन्सीने हेरगिरीसाठी पेगासस स्पायवेअरचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर केला आहे का? हे केंद्र सरकारने सांगावे. पेगासस स्पायवेअरसाठी परवाना घेण्यात आला होता का? अशा अनेक मागणी याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केल्या आहेत.

पेगासस म्हणजे काय?

 • पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरवर जाते. हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी NSO ग्रुपने बनवले आहे.
 • या यादीमध्ये भारतात कोणाची नावे समाविष्ट आहेत? वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत 40 भारतीय पत्रकार, तीन प्रमुख विरोधी नेते, मोदी सरकारमधील दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ता दुजारा मिळाला आहे. पण त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही.
 • पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.

पेगासस कसे काम करतो?

 • सायबर सुरक्षा संशोधन गट सिटीझन लॅबच्या म्हणण्यानुसार, एखाद्या डिव्हाइसवर पेगासस इंस्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या पद्धती वापरतात. याचा एक मार्ग म्हणजे टार्गेट डिव्हाइसवर मेसेजद्वारे​​​​​​​ "एक्सप्लॉइट लिंक" पाठविली जाणे. यूजरने या लिंकवर क्लिक करताच फोनवर पेगासस इंस्टॉल होते.
 • एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, आय मेसेज यापैकी एका माध्यमातून स्पायवेअर फोनमध्ये येतो. पेगाससच्या माध्यमातून ज्याला लक्ष्य करायचे असते, त्याच्या फोनवर एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, आय मेसेज (आयफोनवर) किंवा इतर प्रकारे लिंक पाठवली जाते. अशा संदेशातून लिंक पाठवल्या जातात की, त्यावर ती व्यक्ती एक वेळ क्लिक करेल.
 • एका क्लिकवर स्पायवेअर फोनमध्ये अ‍ॅक्टिव होतो. एकदा अ‍ॅक्टिव्ह झाला की, तो फोनमधील एसएमएस, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, कॉन्ट्रॅक्ट बुक, जीपीएस डाटा, फोटो, व्हिडिओ लायब्ररी, कॅलेंडर असेप्रत्येक अ‍ॅप भेदतो.
 • एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, फोन/व्हिडिओ, अ‍ॅक्टिव्ह मायक्रोफोन, अ‍ॅक्टिव्ह कॅमेरा, कॉल रेकॉर्डिंग, जीपीएस डाटा, कॅलेंडर, कॉन्टॅक्ट बुक मधील महत्त्वाची माहिती नियमित लीक होत राहते.
 • 2019 मध्ये, जेव्हा पेगासस व्हाट्सअ‍ॅपद्वारे डिव्हाइसवर इंस्टॉल केले गेले, तेव्हा हॅकर्सने एक वेगळी पद्धत अवलंबली होती. त्यावेळी हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉल फीचरमधील एका उणीवे​​​​​​​ (बग)चा फायदा घेतला. बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटद्वारे हॅकर्सनी टार्गेट फोनवर व्हिडिओ कॉल केले. याच वेळी एका कोडद्वारे पेगासस फोनमध्ये इंस्टॉल केले गेले होते.
बातम्या आणखी आहेत...