आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्करचा मोठा खुलासा:केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि मंत्री नितीन नवीन यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावे जारी होत आहे पेन्शन; प्रसाद म्हणाले - डिसेंबरमध्येच केले होते खाते बंद

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या आश्रिताला मिळत आहे पेशन्स, कुटुंबाला माहिती नाही

बिहारमध्ये माजी आमदारांना पेन्शन देण्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहार विधानसभा सचिवालयातून आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीमध्ये हे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मृत्यूनंतरही आश्रितांना पेन्शन दिले जात आहे. सदरील प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांच्या आईच्या नावाचा समावेश आहे.

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची आई विमला देवी यांचे 25 डिसेंबर 2020 रोजी निधन झाले आहे. परंतु विधानसभा कार्यालयाच्या मते, अद्यापही विमला देवी यांच्या नावावर पेन्शन जारी केले जात आहे. ही पेशन्स त्यांचे पती ठाकूर प्रसाद यांच्या ऐवजी आश्रित म्हणून मिळत होती. विशेष म्हणजे सध्याही पेन्शन म्हणून त्याच्या खात्यात 30 हजार 750 रुपये जमा केले जात आहे.

भास्करकडे 13 सप्टेंबर 2021 रोजी विधानसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीची प्रत आहे. यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात या लोकांना पेन्शन दिले जात आहे.
भास्करकडे 13 सप्टेंबर 2021 रोजी विधानसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीची प्रत आहे. यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात या लोकांना पेन्शन दिले जात आहे.

मीरा प्रसाद यांच्या नावेही पेशन्स जारी
रस्ते बांधकाम मंत्री नितीन नवीन यांची आई मीरा प्रसाद यांच्या नावाने दरमहा 62 हजार रुपये पेशन्स जारी होत आहे. मीरा प्रसाद यांचे 30 मार्च 2021 रोजी निधन झाले आहे. त्यांचे पती किशोर सिन्हा यांच्यानंतर आश्रित म्हणून मीरा प्रसाद यांना पेशन्स दिली जात होती. तर दुसरीकडे, माजी खासदार विजयसिंह यादव यांच्या नावाने ही पेशन्स दिली जात आहे. यादव यांचे 16 मे 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विधानसभा सचिवालयानुसार, 1996 मध्ये दानापूरचे आमदार असलेले विजयसिंह यादव यांना अजूनही 44 हजार रुपये मासिक पेन्शन दिले जात आहे.

बिहार विधानसभा सचिवालयातून माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीचा खुलासा.
बिहार विधानसभा सचिवालयातून माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीचा खुलासा.

3 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या आश्रिताला मिळत आहे पेशन्स, कुटुंबाला माहिती नाही
भास्करने पेन्शन धारकांसंदर्भात आपला तपास सुरू केला. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे, अशी अनेक नावेही या यादीत सापडली आहे. बेगुसराय जिल्ह्यातील पेन्शनधारकांमध्ये भास्करला तेघराचे माजी आमदार रामेश्वर सिंह यांच्या पत्नी सरस्वती देवीचे नाव मिळाले आहे.

25 जानेवारी 2018 रोजी रामेश्वर सिंह यांची पत्नी सरस्वती देवी यांचे निधन झाले.
25 जानेवारी 2018 रोजी रामेश्वर सिंह यांची पत्नी सरस्वती देवी यांचे निधन झाले.

भास्करने याबाबत विचारणा केली असता असे आढळून आले की, रामेश्वर सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सरस्वती देवी या आश्रित म्हणून पेन्शन घेत होत्या.परंतु, त्यांचे 25 जानेवारी 2018 रोजी निधन झाले होते. तरीही त्यांना बिहार विधानसभा सचिवालयातून पेन्शन देण्यात येत आहे.

बातमी पसरल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी भास्करला त्याच्या आईची बँक स्टेटमेंट दिली.
बातमी पसरल्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी भास्करला त्याच्या आईची बँक स्टेटमेंट दिली.

991 माजी आमदार आणि त्यांचे आश्रित घेत आहेत पेन्शन
बिहार विधानसभा सचिवालयातून आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण 991 माजी आमदार आणि त्यांचे आश्रित पेन्शन घेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त पटना जिल्ह्यातील 61 माजी आमदार आणि त्यांचे आश्रित पेन्शन घेत आहेत. या 61 लोकांच्या पेन्शनवर सरकार दरमहा 28 लाख 39 हजार 250 रुपये खर्च करत आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले - आम्ही खाते बंद केले होते
माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी दुपारी भास्करच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली. विधानसभा कार्यालयाकडून आरटीआय अंतर्गत दिलेली माहिती चुकीची असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, "आई विमला प्रसाद यांच्या निधनानंतर डिसेंबर 2020 मध्येच पेन्शन खाते बंद करण्यात आले आहे. याचा पुरावा म्हणून डिसेंबर 2020 पर्यंत त्या खात्याचे बँक स्टेटमेंट भास्करला पाठवले आहे" असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...