आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Associated With The Agitation Will Not Appear Before The NIS: Farmers Association

शेतकरी आंदोलन:आंदोलनाशी संबंधित लोक एनआयएसमोर हजर राहणार नाहीत : शेतकरी संघटना

नवी दिल्ली/ सिंघू सीमा/टिकरी सीमा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅक्टर रॅलीविरोधात केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे दिसते. आंदोलनाच्या ५३ व्या दिवशी रविवारी शेतकरी संघटनांनी घोषणा केली की, त्यांच्याशी संबंधित कोणताही नेता किंवा कार्यकर्ता एनआयएसमोर (राष्ट्रीय तपास यंत्रणा) हजर राहणार नाही. सरकारला आंदोलनाला बदनाम करायचे असल्याने एनआयएचा वापर केला जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. एनआयएने ‘सिख्स फाॅर जस्टिस’सारख्या (एसएफजे) देशविरोधी संघटनांकडून निधी घेतल्याच्या प्रकरणात बलदेवसिंग सिरसा यांच्यासह आंदोलनातील ४० जणांना समन्स बजावले आहे. शेतकरी आणि केंद्र यांच्यात मंगळवारी ११ व्या फेरीतील चर्चा होणार आहे. याआधी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकेत यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले, हे आंदोलन दीर्घकाळ चालेल असे वाटते.

ट्रॅक्टर रॅलीविरोधात केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
शेतकरी आंदोलन आणि कायद्यांशी संबंधित युक्तिवादावर सोमवारी सर्वाेच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होईल. २६ जानेवारीला नियोजित ट्रॅक्टर रॅलीबाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शेतकरी संघटनांसह संबंधित पक्षांना न्यायालयाने याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच ४ सदस्यीय समितीतून १ सदस्य बाहेर पडल्याने तिच्या पुनर्रचनेबाबतही न्यायालय विचार करेल.

शेतकरी आंदोलनात प्रथमच फूट; नेते गुरनाम चढुनी यांच्यावर गंभीर आरोप
कुंडली बॉर्डर | शेतकरी आंदोलनात रविवारच्या बैठकीत प्रथमच शेतकऱ्यांत फूट दिसून आली. हरियाणा किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम चढुनी यांच्यावर आंदोलनास राजकीय आखाडा केला असल्याचे गंभीर आराेप झाले. काँग्रेसच्या एका नेत्याकडून प्रचंड रक्कम त्यांनी उकळल्याचा आरोपही झाला. या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली. २० जानेवारीला समिती अहवाल देईल. चढुनी वगळता कुणीही संघटनांत वेगळा निधी घेत नाही, त्यांच्या तंबूत आंदोलनस्थळी राजकीय लोकांची ये-जा असते, राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असे आरोप चढुनी यांच्यावर झाले. २६ जानेवारीला दिल्लीत परेड होऊ देणार नाही, असा चढुनी यांनी दिलेला इशारा अफवा होती, असाही आरोप झाला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास प्राधान्य
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास केंद्राचे प्राधान्य आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकात बोलताना सांगितले. कृषी कायदे उत्पन्नात ही वाढ करतील. मोदी सरकारने कृषी बजेट व विविध पिकांचा हमीभाव वाढवला होता. काँग्रेस याबाबत दिशाभूल करत असल्याचे शहा म्हणाले.

आऊटर रिंगवरच रॅली : दरम्यान प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरच काढली जाईल असे जाहीर करण्यात आले. शेतकरी आंदोलनाशी संबंधित योगेंद्र यादव यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...