आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Beat Catering Staff For Not Serving Extra Mutton In Marriage In Supaul Of Bihar

जास्त मटण न वाढल्याने वऱ्हाड्यांनी वाढप्यालाच बदडले:केटरिंगचे तीन कर्मचारी जखमी, बिहारमधील घटना

सुपौल, बिहार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या सुपौलमध्ये वाढप्याने जास्तीचे मटण न वाढल्याच्या रागातून वऱ्हाडी मंडळींनी केटरर्स कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सुपौलच्या त्रिवेणीगंज ठाणे हद्दीत घडली.

घटनेविषयी जखमींनी सांगितले की बुधारी त्रिवेणीगंड ठाणे हद्दीत राहणाऱ्या तस्लीम यांच्या मुलीचे लग्न होते. यावेळी वऱ्हाडींनी केटरर्सना जास्तीचे मटण मागितले. केटरर्सनी मटण देण्यास नकार दिल्यावर वऱ्हाडी नाराज झाले आणि वादाला सुरुवात झाली. वाद इतका वाढला की वऱ्हाडी आणि केटरिंग कर्मचाऱ्यांत मारहाण सुरु झाली. मटण न वाढल्याने संतप्त झालेल्या वऱ्हाडींनी केटरिंग कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. यात तीन केटरिंग कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमींना उपचारांसाठी त्रिवेणीगंज मंडळ रुग्णालयात नेण्यात आले.

तिन्ही जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉ. दीपक कुमार यांनी सांगितले. जखमींची नावे सुमित कुमार, अजय कुमार आणि मन्नु कुमार अशी आहेत. या प्रकरणी केटरिंग कर्मचाऱ्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.

लोकांना जेवण वाढत असताना एक जण जास्तीचे मटण मागत होता. त्याला नकार दिल्यावर त्याने शिवीगाळ सुरु केली. याला विरोध केल्यावर त्याने मारहाण सुरु केल्याचे जखमी मन्नु कुमारने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...