आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Considered Him A Simple Clerk, But Munshi's Eyes Watered When 7 High Court Judges Came In Honor Of His 65 Years Of Service.

जोधपूर:लोक त्यांना साधा कारकून समजत होते, पण 65 वर्षांच्या सेवेचा सन्मान म्हणून हायकोर्टाचे 7 जज आले तेव्हा मुन्शींचे डोळे पाणावले

जोधपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुन्शी मालूंसोबतचे 7 वकील त्यांच्या शिकवणुकीतून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात जज झाले

राजस्थानमध्ये ६५ वर्षे वकिलांचे सहकारी म्हणून मुन्शी गुलाबचंद मालू यांनी काम केले. शुक्रवारी बार असोसिएशनने त्यांचा सत्कार केला तेव्हा राजस्थान हायकोर्टाचे सात न्यायमूर्ती स्वत:हून समारंभाला आले. त्याचे कारण म्हणजे आतापर्यंत मालूंसोबत काम करणारे सात वकील सुप्रीम कोर्टात व हायकोर्टात न्यायमूर्ती झाले आहेत. एक जण केंद्रीय कायदामंत्री झाले तर एक सध्या राज्याचे महाधिवक्ता आहेत. हे सर्व जण त्यांच्याकडून शिकले. समारंभात मालूंचे डोळे पाणावले. अभिनंदन करताना हायकोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती संगीतराज लोढा म्हणाले, ‘ज्येष्ठ विधिज्ञ मरुधर मृदुल यांच्या कार्यालयात जॉइन झालो तेव्हा मालूंकडून अनेक गोष्टी शिकलो. तेच माझे पहिले गुरू होते. ऑफिसच्या सर्व फायली, खटले व पेशीच्या तारखा त्यांना तोंडपाठ असत.’

मालू यांना सन्मानित करताना न्यायमूर्ती लोढा म्हणाले,‘मुन्शीने फिर्यादीच्या पैशांचा हिशेब ठेवायला हवा असे मालू साहेब तेव्हा म्हणत असत. ते नेहमी एक डायरी जवळ ठेवत असत. त्यात ते फिर्यादीच्या पैशांचा हिशेब, पेशीची तारीख नोंदवून ठेवायचे. वकिलीच्या सुरुवातीच्या दिवसांत मुन्शीच वकिलांचे प्रथम गुरू असतात. मालूंसोबत काम करताना मी बऱ्याच गोष्टी शिकलो.’

१९३५ मध्ये फलौदीत जन्मलेल्या मालूंनी १९५१ मध्ये अॅडव्होकेट मंगलचंद वैद्य यांच्या ऑफिसपासून काम सुरू केले. त्यानंतर मोहनलाल जोशी आणि मरुधर मृदुल यांसारख्या प्रख्यात वकिलांसोबत दीर्घकाळ काम केले. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी, न्यायमूर्ती राजेंद्र व्यास, न्यायमूर्ती प्रेम आसोपा, न्यायमूर्ती विनीत कोठारी, न्यायमूर्ती संगीतराज लोढा, न्यायमूर्ती संदीप मेहता, न्यायमूर्ती विनीत माथूर, माजी केंद्रीय मंत्री पी. पी. चौधरी आणि महाधिवक्ता एम. एस. सिंघवी यांनी कोर्टाचे प्रक्रियात्मक ज्ञान मुन्शी गुलाबचंद मालू यांच्याकडूनच घेतले.

बातम्या आणखी आहेत...