आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सर्वसामान्य जनता आणि सरकारी यंत्रणेच्या पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्धारित दिशानिर्देशांचे योग्य रीतीने पालन होत नसल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी काळजी व्यक्त केली. न्या. अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम.आर. शाह यांच्या पीठाने म्हटले की, ‘बहुतांश लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील तर अशा दिशानिर्देशांचा काय फायदा? आम्ही लग्नसोहळे व राजकीय सभा पाहत आहोत. त्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लाेक मास्क घालत नाहीत. जे घालत आहेत त्यांचे मास्क गळ्यातच लटकत आहेत. तुम्हाला समजले पाहिजे की ही कोरोनाची दुसरी लाट आहे. असेच सुरू राहिल्यास पुढे स्थिती आणखी बिघडत जाईल.’
गुजरातेतील राजकोटमध्ये कोरोना रुग्णालयातील आगीत ६ रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी केली. या प्रकरणाची कोर्टाने स्वत:हून दखल घेत सुनावणी सुरू केली आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थेबाबत सुनावणी सुरू असताना कोर्टाने ही टिप्पणी केली.
तुम्ही पुढाकार घ्या, जबाबदाऱ्या ठरवा : केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता म्हणाले, आगीच्या घटनांबाबत आधीच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत. आता नव्याने ते जारी केले जातील.’ त्यावर कोर्ट म्हणाले, ‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची अंमलबजावणीही गरजेची आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’
आयसीयू वाॅर्डच भस्मसात
राजकोटच्या चारमजली उदय शिवानंद कोरोना रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. वॉर्डात एकूण ११ रुग्ण भरती होते. त्यापैकी तिघांचा जागेवरच कोळसा झाला. उपचारांदरम्यान तीन जण दगावले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.