आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरजावई... सर्वसाधारण बोलाचालीत हा शब्द एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पाेहोचू शकतो. मात्र, झारखंडच्या दोन गावांतील लोकांनी मुली आपल्या जवळच राहाव्यात या इच्छेखातर चक्क जावयांचेच पूर्ण गाव वसवले आहे. सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील आसंगी आणि बरगीडीह गावात ५४ वर्षांपूर्वी तीन कुटुंबांनी लेकी लग्नानंतर आपल्यापासून दूर जाऊ नयेत यासाठी गावाजवळ घर-जमीन देऊन गाव वसवले. हा ट्रेंड असा काही चालला की जमाईपाडा गावच वसले. गावातील १०० कुटुंबांपैकी ६० आजही जावयांची आहेत. येथे मुलीला लक्ष्मी आणि जावयास राजा मानले जाते. मात्र, बोलचालीत या गावाच्या नावावरून खिल्लीही उडवली जात होती. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामस्थांनी अलीकडेच जमाईपाडाचे नाव बदलून लक्ष्मीनगर केले आहे. मात्र, तरीही लोक जमाईपाडा नावानेच गावाला ओळखतात.
पुरोहित म्हणाले होते... कन्या लक्ष्मी, जाऊ देऊ नका - गावातील ज्येष्ठ नागरिक दीनानाथ महतो यांच्यानुसार, १९६७ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यादरम्यान गावात एक पुरोहित आला होता. त्याने सांगितले की, मुलगी लक्ष्मी असते, ती ज्या घरी जाते, तिथे आनंद घेऊन जाते. जावयाला जमीन दान देऊन लेक-जावयाला गावातच राहू द्या, चांगला पाऊस पडेल. यानंतर ३ जणांनी जमीन देऊन जावयाला जवळ ठेवून घेतले. यानंतर ही परंपरा सुरू झाली आणि जमाईपाडा वसला.
परंपरा पुढे सुरू - जमाईपाडामध्ये लेक-जावयाला स्थायिक करणारे अमूल्यो प्रधान म्हणाले, प्रत्येक बापाला मुलगी आनंदी असावी असे वाटते. ती लग्नानंतरही समोर असावी असे वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.