आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Should Ask In The State Governments Why The Tax On Petrol And Diesel Was Not Reduced In The States: Nirmala Sitharaman

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन गदारोळ:टॅक्स का कमी केला नाही हे लोकांनी राज्य सरकारला विचारावे - निर्मला सीतारमण

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, लोकांनी त्यांच्या राज्य सरकारला विचारावे की त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी केले नाहीत. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्य सरकारांनीही व्हॅट कमी करण्याची मागणी केली होती. आता या लोकांनी ज्या पक्षांना मतदान केले त्यांना याविषयी विचारायला हवे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील 10 रुपयांनी कमी केले होते. त्यापाठोपाठ कर्नाटक, पुद्दुचेरी, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लडाख यांनी त्यावर व्हॅट कपात केली आहे.

काँग्रेस शासित राज्यांनी व्हॅट कमी केला नाही
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर एकीकडे भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये तत्काळ कपात केली, तर राजस्थान, केरळ, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या बिगर भाजपशासित राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली नाही.

टॅक्सनंतर पेट्रोल 2 पटीने महाग झाले आहे
देशात सध्या पेट्रोलची मूळ किंमत 47.93 रुपये आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या कर आकारणीमुळे देशाच्या काही भागात त्यांच्या किमती 115 रुपयांच्या जवळ पोहोचल्या आहेत. केंद्र सरकार 27.90 रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे. यानंतर राज्य सरकारे आपापल्या परीने त्यावर व्हॅट आणि सेस लावतात. यामुळे पेट्रोलची किंमत मूळ किमतीच्या 2 पट जास्त आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलवर 51.89 रुपये आणि डिझेलवर 34.48 रुपये जास्त आकारले जातात.

बातम्या आणखी आहेत...