आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात भयंकर पाणी संकट होते. पूर्वजांनी बनवलेले शेकडो वर्षे जुने भूमिगत झरे (तलापरिगे) जिवंत करत लोकांनी यावर मात केली. निरकल्लू गावातील रामकृष्ण भूमिगत झरा जिवंत करणाऱ्यांपैकी एक. ते सांगतात १० वर्षांच्या दुष्काळामुळे परिसरात पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता. मात्र, एका लहानशा तलावाच्या तळाशी नेहमीच पाणी असायचे. याचे आश्चर्य वाटले. त्याचा स्रोत शाेधून काढण्यासाठी पाणी बचतीसाठी काम करणारे मल्लिकार्जुन होसापालया यांना बोलावले. त्यांनी सांगितले की, पाणी बचतीची प्राचीन पद्धत तलापरिगे आहे. याचा अर्थ आहे जमिनीतून निघणारा झरा. या भागाची जमीन खडकाळ आहे, जमिनीखाली खडकांवर पाणी असते. ते बाहेर येते. झुडपे उगवल्याने व सफाई नसल्याने पाण्याचा स्रोत बंद होतो, मात्र आत पाणी असते. रामकृष्ण सांगतात, यानंतर गावकऱ्यांनी ५ लाख रुपये खर्च करून हा भूमिगत झरा जिवंत केला. अनेक स्रोत आढळले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही सोय झाली. भूमिगत झऱ्याजवळ ६० फुटांवरच पाणी सापडते. त्याआधी गावातील ४०० घरे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून होती.
१९६० पासून दोन हजार वर्षे जुनी ही पद्धत वापरात नव्हती
मल्लिकार्जुन यांनी पूर्ण भागात सुमारे ३०० तलापरिगे जिवंत केले आहेत. ते म्हणतात, ही पद्धत दोन हजार वर्षे जुनी आहे. लेखी दस्तऐवज सोळाव्या शतकापासून आढळतात. त्याच्या आसपासच गावे वसायची. तलापरिगेजवळ मंदिर बांधले जायचे, तेथे उत्सव व्हायचे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.