आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LAC वर पुन्हा सक्रिय झाला चीन:​​​​​​​लडाख सीमेवर चीनच्या हालचाली; 8 ठिकाणी लष्करासाठी तयार केल्या छावण्या, प्रत्येक ठिकाणी 84 तंबू

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सीमा वाद सुरु आहे. 17 महिन्यांपूर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर पुन्हा एकदा चीन भारताच्या सीमेवर सक्रिय झाला आहे. गुप्तचर अहवालानुसार, चीनने पूर्व लडाखच्या समोर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास 8 ठिकाणी नवीन मॉड्यूलर कंटेनर तयार करत आहे. हे बंकर चीनी सैनिकांना राहण्यासाठी बांधले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तरेकडील काराकोरम खिंडीजवळील वहाब जिल्गापासून पियू, हॉट स्प्रिंग्स, चांग ला, ताशीगोंग, मांजा आणि चुरूप पर्यंत सैनिकांसाठी आश्रयस्थान बांधले आहेत. या प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये 80 ते 84 कंटेनर बनवले गेले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी चकमकीनंतर चीनने अनेक छावण्या उभारल्या आहेत. परंतु, सध्याच्या छावण्यावरुन चीनचा दीर्घकाळ सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्याचा कोणताही हेतू नाही असे दिसून येत आहे.

सीमेवर दोन्ही देशांचे 50-50 हजार सैनिक तैनात
भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. पूर्व लडाखजवळील सीमा रेषेवर दोन्ही देशांनी 50-50 हजार सैनिकांना तैनात केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशांतील सैन्यांकडे हॉविट्झर्स, टँक आणि पृष्ठभागावरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. या अस्वस्थ परिस्थितीत दोन्ही बाजूंचे सैन्य नियमितपणे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत विस्तारलेल्या या प्रदेशात चीनने अनेक हवाई पट्ट्या आणि नवीन हेलिपॅड देखील बांधले आहेत. यासोबतच चीनने आपले प्रमुख हवाई तळ होतन, काशगर, गारगुन्सा, ल्हासा-गोंगगर आणि शिगत्से या हवाई तळांना सुधारित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...