आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LAC वर चीनची कुरापत:भारतीय हद्दीत घुसलेला चिनी सैनिक ताब्यात, तीन महिन्यात दुसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लडाखमध्ये तैनात भारतीय सैनिक. गेल्या वर्षी जूनपासून LAC वरून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
लडाखमध्ये तैनात भारतीय सैनिक. गेल्या वर्षी जूनपासून LAC वरून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. (फाइल फोटो)
  • याआधी ऑक्टोबरमध्ये घुसखोरी केलेल्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्काराने ताब्यात घेतले होते

चीन आपल्या कुरापती थांबवण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी एका सैनिकांनी भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले. याआधी ऑक्टोबरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय सीमेत घुसखोरीच्या आरोपात अटक केली होती.

पँगोन्ग त्सो सरोवराजवळची घटना

भारतीय लष्करानुसार, जानेवारी शुक्रवारी एका चिनी सैनिकाला भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. सदरील घटना पँगोन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण भागात घडली. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) या सैनिकाला या भागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी बघितले होते.

लष्करानुसार, LAC च्या दोन्ही बाजूने भारत आणि चीनचे सैनिक तैनात आहेत. गेल्यावर्षी 15 जून रोजी झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही देशांनी येथे सैन्य तैनाती वाढवली आहे. या सैनिकाने कोणत्या परिस्थितीत भारतीय हद्दीत घुसखोरी केली याचा शोध घेतला जात आहे.

चीनला दिली माहिती

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला म्हटले की, चिनी सैनिकाला ताब्यात घेतल्याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. याबाबतीत दोन्ही सैन्य संपर्कात आहेत. ऑक्टोबरनंतर दुसऱ्यांदा PLA च्या सैनिकाला ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना आहे. ऑक्टोबरमध्ये डेमचोक भागात एका चिनी सैनिकाला ताब्यात घेतले होते. 21 ऑक्टोबर रोजी चुशूल-मॉल्डो मीटिंग पॉइंटवर चिनी अधिकाऱ्यांकडे त्याला सुपूर्द केले होते. तो सैनिक दोन दिवस भारतीय सैन्याच्या ताब्यात होता.

बातम्या आणखी आहेत...