आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेटा, अॅमेझॉन, ट्विटर, अल्फाबेटनंतर आता पेप्सिकोदेखील कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. वॉल स्ट्रीटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आर्थिक मंदीची शक्यता लक्षात घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती आहे. पेप्सिको ही शीतपेय क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. वॉल स्ट्रीटच्या अहवालानुसार, पेप्सिको नॉर्थ अमेरिकन स्नॅक आणि बेव्हरेजेस विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. कंपनी तंत्रज्ञान आणि मीडिया विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते.
100 हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता
या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पेप्सिको 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. या प्रकरणी कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. विशेष म्हणजे, याआधी अमेझॉन, ट्विटर, मेटा, मायक्रोसॉफ्ट, अॅपल या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
निर्णयामागील कारण काय?
पेप्सिको आपल्या कंपनीत काम करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी तंत्रज्ञान आणि मीडिया विभागातील अनेक कर्मचार्यांची छाटणी करण्याचा विचार करत आहे. या छाटणीत, पेय व्यवसायातील लोकांची छाटणी केली जाईल. कारण स्नॅक्स युनिटमध्ये यापूर्वीच अनेक कर्मचार्यांची छाटणी करण्यात आली आहे. पेप्सिको चिप्स, क्वेकर ओट्स, डोरिटोस आणि कोल्ड ड्रिंक्सचे उत्पादन करते.
जगभरातील मंदीची भीती
कंपनीच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत जगभरात सुमारे 3,09,000 कर्मचारी कार्यरत आहेत. फक्त अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर कंपनी 1.29 लाख लोकांना नोकऱ्या देते. अमेरिकेत मंदीची भीती सतत वाढत आहे. यामुळे देशातील सर्व मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. यासोबतच कंपन्यांनी नव्या भरतीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगात नोकरीचे संकट निर्माण होऊ शकते.
अमेरिकन कंपन्यांनी विस्तार थांबवला
चलनवाढ, मंदावलेली अर्थव्यवस्था, अमेरिका आणि युरोपमधील मंदीची भीती आणि युक्रेन-रशिया युद्ध या चिंतेमुळे कंपन्या त्यांचा विस्तार थांबवत आहेत. मेटा, ट्विटर आणि टेस्लासह काही कंपन्यांनीही यूएस मार्केटमधील अनिश्चिततेच्या दरम्यान नोकरभरती कमी केली आहे.
पेप्सिको एक खाद्यपेयांची विक्री करणारी अग्रगण्य कंपनी आहे. इंदिरा नूयी या भारतीय-अमेरिकन महिला 12 वर्षे या कंपनीची मुख्य कार्याधिकारी होत्या. त्यांचा पेप्सिको कंपनीला यशोशिखरावर नेण्यात मोठा वाटा आहे. 1965 मध्ये पेप्सी कोला कंपनी आणि फ्रिटो लेझ या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर पेप्सिको अस्तित्वात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.