आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेच:सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांमुळे राेज 3,500 काेटींचे नुकसान, सर्वोच्च न्यायालयात गेलेले याचिकाकर्ते म्हणतात...

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जानेवारीला काँग्रेस साजरा करणार शेतकरी हक्क दिवस

केंद्र सरकारचे तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या अांदाेलनाच्या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अाली अाहे. याचिकाकर्ते ऋषभ शर्मा यांनी याचिकेत दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांमुळे राेज ३,५०० काेटी रुपयांचे नुकसान हाेत असल्याचे माध्यमांच्या अाधारे म्हटले अाहे. शेतकऱ्यांना दिल्ली सीमेवरून हटवण्याची मागणी यात करण्यात अाली अाहे. रस्ता जाम करून अांदाेलन करणे हे शाहीनबाग प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन अाहे. सर्वाेच्च न्यायालयाने १६ व १७ डिसेंबरला दिलेल्या अादेशात शेतकऱ्यांना शांततेत अांदाेलन करण्यासाठी म्हटले हाेते. परंतु पंजाबमध्ये टेलिफाेन टाॅवरची ताेडफाेड झाल्याचा दावा याचिकेत केला अाहे.

मुख्य न्यायाधीश एस. ए. बाेबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठ ११ जानेवारीला शेतकरी अांदाेलनाच्या विराेधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करणार अाहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर बाॅर्डरवर शनिवारीही धरणे-अांदाेलन सुरू राहिले. हरियाणातील अंबाला-हिसार महामार्गावर शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विराेधात ट्रॅक्टर रॅली काढली. ब्रिटनमधील कामगार पक्षाचे खासदार तनमनजितसिंह ढेसी यांनी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांना पत्र लिहून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली अाहे.

१५ जानेवारीला काँग्रेस साजरा करणार शेतकरी हक्क दिवस
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस १५ जानेवारीला शेतकरी हक्क दिन साजरा करेल आणि पक्षाचे नेते सर्व राजभवनांकडे कूच करतील. त्याच दिवशी शेतकरी व सरकार यांच्यात पुढच्या टप्प्यातील चर्चा होईल. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस व प्रभारी यांच्याबराेबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, १५ जानेवारी रोजी प्रादेशिक मुख्यालयात पक्षाचा मेळावा व धरणे झाल्यानंतर राजभवनामध्ये तिन्ही काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय साेनिया गांधी यांनी घेतला अाहे.

बातम्या आणखी आहेत...