आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Permission Can Be Given To Enter The Country Within 10 Days, Due To Corona Infection, There Is A Ban Since March 2020

परदेशी पर्यटकांसाठी उघडणार देशाचे दरवाजे:10 दिवसांच्या आत भारतात येण्याची दिली जाऊ शकते परवानगी, कोरोना संक्रमणामुळे मार्च 2020 पासून घातली आहे बंदी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तारीख आणि अटी विचारात घेतल्या जात आहेत

परदेशी पर्यटकांसाठी लवकरच देशाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की या संदर्भात औपचारिक घोषणा येत्या 10 दिवसात केली जाऊ शकते. कोरोना महामारीमुळे परदेशी पर्यटकांना मार्च 2020 मध्ये भारतात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, यामुळे पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या पाच लाख विदेशी पर्यटकांना मोफत व्हिसा दिला जाईल. यासाठी कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत असेल. मात्र, जर या कालावधीपूर्वी पाच लाख मोफत व्हिसा दिले गेले, तर ही प्रक्रिया तिथेच थांबवली जाईल. यासाठी 100 कोटी रुपयांचा आर्थिक खर्च होऊ शकतो.

तारीख आणि अटी विचारात घेतल्या जात आहेत
परदेशी पर्यटकांना देशात कधी येऊ द्यायचे याचा अधिकारी विचार करत आहेत. अटींचाही विचार केला जात आहे. तूर्तास, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा विचार आहे. अशा देशांची यादी देखील केली जाऊ शकते जिथे संसर्ग जास्त आहे. तूर्तास त्यांच्या पर्यटकांवरील बंदी चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...