आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय चलनावर म्हणजेच रुपयावर महात्मा गांधींचा फोटो आहे. पण लवकरच नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर आणि देशाचे 11 वे राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क फोटो काही नोटांवर दिसू शकतात. वृत्तानुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोटांच्या मालिकेवर कलाम आणि टागोर यांचा वॉटरमार्क वापरण्याचा विचार करत आहे.
टागोर यांना त्यांच्या गीतांजली या काव्यात्मक रचनेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर कलाम हे देशातील महान वैज्ञानिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. नोटांवर या व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे छापली गेली, तर रुपयावर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांचा फोटो छापण्याची रिझर्व्ह बँकेची पहिलीच वेळ असेल.
गांधी, टागोर आणि कलाम यांचे वॉटरमार्क नमुने तयार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयआयटी-दिल्लीचे एमेरिटस प्रा. दिलीप टी. साहनी यांना गांधी, टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्कचे दोन वेगवेगळे नमुने पाठवण्यात आले आहेत. साहनी यांना दोन संचांमधून निवडण्यास आणि सरकारच्या अंतिम विचारासाठी ठेवण्यास सांगितले आहे. वॉटरमार्कची तपासणी करणारे प्रा. साहनी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तज्ज्ञ आहेत. याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.
पहिल्यांदा 1969 मध्ये छापले बापूंचे छायाचित्र
1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने 100 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींचा फोटो छापला होता. हे गांधींचे जन्मशताब्दी वर्ष होते आणि आठवण म्हणून नोटेवर बापूंचे छायाचित्र छापले. नोटेवरील चित्राच्या मागे सेवाग्राम आश्रमाचे चित्रही होते. 1987 मध्ये जारी करण्यात आलेल्या नोटांवर पहिल्यांदा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो छापण्यात आला होता. या फोटोसह 500 रुपयांची पहिली नोट ऑक्टोबर 1987 मध्ये आली होती. यानंतर गांधीजींचा हा फोटो इतर नोटांवरही वापरला जाऊ लागला.
सोशल मीडियावर बोस-भगतसिंग यांचा फोटो छापण्याची मागणी
क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस आणि सरदार भगतसिंग यांची छायाचित्रे भारतीय चलनावर छापण्याची मागणी सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून होत आहे. नोटेवर टागोर आणि कलाम यांचा फोटो आल्यास येत्या काळात बोस, भगतसिंग यासारख्या राष्ट्रीय वीरांचेही फोटो नोटेवर दिसू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.