आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर 1742 मध्येच बनले असते विश्वनाथ मंदिर:पेशव्यांनी केली होती काशीवर हल्ला करण्याची तयारी; पण कुणीही केले नव्हते सहकार्य

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीचे ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायालयापासून उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत चर्चेत आहे. पण आता काशीच्या इतिहासावर स्वतंत्रपणे संशोधन करणारे ज्येष्ठ विधिज्ञ तथा बनारस बार असोसिएशनचे माजी महामंत्री नित्यानंद राय यांनी विश्वनाथ मंदिराप्रकरणी नवे तथ्य सादर केले आहे.

वकील नित्यानंद राय यांनी दावा केला आहे की, 1742 मध्ये काशीच्या नागरिकांनी साथ दिली असती तर औरंगजेबाच्या आदेशाने उद्ध्वस्त करण्यात आलेल्या प्राचीन विश्वनाथ मंदिराच्या जागी तेव्हाच नवे मंदिर झाले असते. पण असे शक्य झाले नाही. त्यामुळे आता विश्वनाथ मंदिर व ज्ञानवापीच्या मुद्यावर लांबलचक खटल्याला सामोरे जावे लागत आहे.

वकील नित्यानंद राय दी बनारस बार असोसिएशनचे माजी महामंत्री आहेत.
वकील नित्यानंद राय दी बनारस बार असोसिएशनचे माजी महामंत्री आहेत.

1742 मध्ये बाजीराव मिर्झापूरमध्ये थांबले होते

वकील नित्यानंद राय दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले की, काशी विश्ननाथ मंदिर औरंगजेबाच्या आदेशाने पाडण्यात आल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यानंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराजवळ दुसऱ्या एका मंदिराचा जीर्णोद्धार केला. बाबा विश्वनाथांना मुक्त करण्याची मराठ्यांची इच्छा होती. त्यानुसार 1 जून 1742 रोजी पेशवा बाळाजी बाजीराव यांनी मिर्झापूरला तळ ठोकला होता. ज्ञानवापी मशिद पाडून पुन्हा त्या ठिकाणी आदि विश्वेश्वरांचे मंदिर बांधण्याचा त्यांचा हेतू होता.

अत्याचाराच्या भीतीने घाबरले होते स्थानिक

अवधचा नवाब सफदरजंगला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी काशीच्या पंडितांना गोळा करून बाळाजी बाजीरावांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यावर काशीची स्थानिक जनता भयभीत झाली. ज्ञानवापी मशिद बादशहाच्या आदेशाविना पाडण्यात आली तर ते नाराज होऊन आपल्याला भयावह अत्याचाराला सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांना वाटत होती.

त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा विचार योग्य वाटला. स्थानिक लोकही ज्ञानवापी मशिदी पाडून पुन्हा आदि विश्वेश्वराचे मंदिर बांधण्यासंबंधि द्विधा मनस्थितीत होते. एकीकडे धर्माचा प्रश्न होता. तर दुसरीकडे जिवाची भीती होती. स्थानिक लोकानी धर्मापेक्षा जिवाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे बाळाजी बाजीराव आपला उद्देश मनातच ठेऊन आल्यापावली माघारी फिरले.

16 मे 2022 चे हे छायाचित्र समितीच्या कारवाईवेळचे आहे. त्यात ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात हे दगडाची संरचना आढळली. हिंदू पक्षाने हे प्राचीन शिवलिंग असल्याचा; तर मुस्लिम पक्षाने हा बंद पडलेला पाण्याचा फवारा असल्याचा दावा केला आहे.
16 मे 2022 चे हे छायाचित्र समितीच्या कारवाईवेळचे आहे. त्यात ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात हे दगडाची संरचना आढळली. हिंदू पक्षाने हे प्राचीन शिवलिंग असल्याचा; तर मुस्लिम पक्षाने हा बंद पडलेला पाण्याचा फवारा असल्याचा दावा केला आहे.

1789 मध्ये झाला होता दुसरा प्रयत्न

वकील नित्यानंद राय म्हणाले की, डंकनच्या काळातही मराठ्यांनी मुस्लिमांना नुकसानभरपाई देऊन ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला होता. महादजी शिंदे यांनी यासंबंधी 1789 मध्ये प्रयत्न केला होता. पण इंग्रजांना मुस्लिमांशी वैर नको होते. त्यामुळे काहीच घडले नाही.

नाना फडणवीसांनी टीपू व इंग्रजांच्या युद्धावेळी इंग्रजांना ज्ञानवापीच्या ठिकाणी प्राचीन विश्वनाथ मंदिर पुन्हा उभे करण्याच्या अटीवर मदत केली होती. पण त्यातूनही काही फलनिष्पत्ती झाली नाही. इंग्रज आपल्या आश्वासनापासून फारकत घेतली.

1761 मध्ये पानीपतच्या युद्धात पराभव झाल्यानंतर मराठ्यांची बाबा विश्वनाथांना मुक्त करण्याची इच्छा नेहमीसाठीच लयास गेली. विश्वनाथांचे प्राचीन मंदिर पुन्हा मूळ स्वरुपात आणण्यात सहकार्य न केल्यामुळे मराठे व इंग्रजांत वैर निर्माण झाले. याची माहिती जोनाथन डंकन नामक लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या 10 ऑगस्ट 1792 च्या एका पत्रातूनही मिळते.

बातम्या आणखी आहेत...