आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:रेमडेसिविर बनवणाऱ्या 10 कंपन्यांवर याचिका दाखल, भारतात वैध परवान्याशिवाय औषधांचे उत्पादन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिविर बनवणाऱ्या 10 कंपन्यांवर याचिका दाखल

कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर आणि फेविपिरामिरचे देशात उत्पादन करणाऱ्या १० कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी केंद्र सरकारला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे सांगितले.

कोर्टाने म्हटले की, हे प्रकरण सरकारला माहीत असावे म्हणून केवळ केंद्राला नोटीस बजावत आहोत. याचिकाकर्ते एम. एल. शर्मा म्हणाले, कोरोनावर कोणत्याही देशाने अद्याप उपचार शोधलेला नाही. अशात जगभरात रेमडेसिविर व फेविपिरामिर कोरोना उपचारात बऱ्याच प्रमाणात प्रभावी असल्याचा समज आहे.

भारतात १० मोठ्या औषधी कंपन्या या औषधांचे उत्पादन करत आहेत. या कंपन्यांनी या दोन्ही औषधांच्या उत्पादनासाठी भारत सरकारकडून स्वतंत्रपणे परवानाही घेतला नाही व स्वत:ही चाचणी केलेली नाही. तरीही दोन्ही औषधांचे उत्पादन भारतात होत आहे आणि त्यांची विक्रीही केली जात आहे.