आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पेचप्रसंग:नागरिकांतर्फे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता मतदार नागरिकांतर्फे दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेचाही समावेश आहे. याद्वारे नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एेकून घ्यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, उद्धव ठाकरे इत्यादींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांसह २२ ऑगस्टला सुनावणी होईल. लोकशाहीची मूलभूत रचना व मतदारांनी केलेल्या मतदानाचा सन्मान करण्याची जबाबदारी पाळताना राजकीय नेते दिसत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...