आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमच्या पॅरोलविरोधात HCत याचिका:डेरा म्होरक्यांकडून नियमांचे उल्लंघन, पुन्हा तुरुंगात डांबण्याची मागणी

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साध्वी लैंगिक शोषण व हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमच्या पॅरोलचा मुद्दा पुन्हा हाय कोर्टात पोहोचला आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील एच सी अरोरा यांनी राम रहीमच्या पॅरोलविरोधात याचिका दाखल केली आहे. राम रहीम पॅरोलच्या काळात हरियाणा सरकारच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. विशेषतः त्याला मंजूर करताना पंजाब सरकारचे मत विचारात घेतले गेले नसल्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही राम रहीमच्या पॅरोला विरोध केला आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही राम रहीमच्या पॅरोला विरोध केला आहे.

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम नुकताच 40 दिवसांच्या पॅरोलवर रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर आला आहे. सध्या तो उत्तर प्रदेशच्या बागपत स्थित बरनावा आश्रमात ऑनलाइन सत्संग करत आहे. राम रहीमने दिवाळी साजरी करणे व एक गाणे रिलीज केल्यानंतर मोठा वाद उद्भवला आहे.

भटिंडामध्ये राम रहीमच्या ऑनलाइन प्रवचनाविरोधात निदर्शने करण्यात आली.

या नियमांकडे दुर्लक्ष

वकील एच सी अरोरा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, नियमांनुसार पॅरोलवर सुटणाऱ्या व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मत विचारात घेतले जाते. पण राम रहमीच्या प्रकरणात या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात आले. राम रहीमचा पंजावर थेट प्रभाव पडतो. पण हरियाणा सरकारने त्याला पॅरोल मंजूर करताना पंजाब सरकारचे कोणतेही मत विचारात घेतले नाही.

शांतता भंग होण्याचा धोका

राम रहीमच्या पॅरोलवरील सुटकेमुळे शांतता भंग होण्याचा धोका असल्याचा दावाही अरोरांनी आपल्या याचिकेत केला आहे. ऑनलाइन सत्संगामुळे पंजाबमधील स्थिती बिघडू शकते. सोमवारीच भटिंडाच्या डेरा सलाबतपुरात निदर्शने झाली. त्यामुळे राम रहीमची पॅरोलवर सुटका करताना पंजाबचेही मत विचारात घेतले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ऑनलाइन सत्संग करता येत नाही

पॅरोलवर सुटका करताना काही अटी ठेवल्या जातात. स्थानिक पोलिसांना पॅरोल मिळणाऱ्यावर नजर ठेवण्याची सूचना केली जाते. मोबाइल व इतर संचार माध्यमांच्या वापरावर बंदीची अटही टाकली जाते. पण राम रहीमच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. तो इंटरनेटवर गाणे गात आहे. त्यामुळे त्याचा पॅरोल रद्द केला जावा, असेही अरोरांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...