आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:मशीद परिसरातील श्रृंगार गौरीच्या पूजेचा महिलांना हवाय अधिकार, ज्ञानवापी याचिकाकर्त्या सीता साहूंची मागणी

चंदन पांडेय | वाराणसीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
माता श्रृंगार गौरीचे दर्शन होत नाही. तेथे चबुतरा आहे. त्याची पूजा होते, अशी माहिती सीता साहू यांनी दिली. - Divya Marathi
माता श्रृंगार गौरीचे दर्शन होत नाही. तेथे चबुतरा आहे. त्याची पूजा होते, अशी माहिती सीता साहू यांनी दिली.

ज्ञानवापी मशिदीच्या मैदानातील कुंडात शिवलिंग पूजनाच्या अधिकारावरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद उपोषण करत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सरकार न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु संत समाज पूजेच्या अधिकारावर आडून आहे. ज्ञानवापीत पूजेच्या अधिकाराची ही पहिली लढाई नाही. एक लढाई श्रृंगार गौरी पूजनासाठी देखील लढली जात आहे.

लढाईत काशी विश्वनाथ मंदिर व ज्ञानवापी मशीद प्रकरणात याचिका दाखल करून त्यास चर्चेत आणणाऱ्या पाच महिलाही सामील आहेत. त्यापैकी चार वाराणसी व एक दिल्लीची रहिवासी आहे.दैनिक भास्करने श्रृंगार गौरी व ज्ञानवापी मशिदीबद्दल खटला दाखल करणाऱ्या सीता साहू यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, माता श्रृंगार गौरी सौभाग्याची देवी आहे. त्यांनी याचिका दाखल करण्यामागील कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, २०२० मध्ये माता श्रृंगार गौरीच्या दर्शनसाठी गेले होते. चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी सात वाजता ज्ञानवापी येथील प्रवेशद्वारासमोर रांगेत उभे होते. प्रशासनाने तेव्हा साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी परवानगी दिली होती. एकानंतर एक महिला आत जात होत्या. पूजनास तिथपर्यंत जाण्यासाठी खूप कसरत करावी लागली. गर्दीत धक्काबुक्कीत माझ्या हातातील सौभाग्याची सामग्री खाली पडली. मला दु:ख झाले.मी तेथेच रडायला लागले. तेव्हा पूजेसाठी आलेल्या इतर महिलांनी मला शांत केले. वर्षातून केवळ एक वेळा हे मंदिर सुवासिनींसाठी खुले होते. त्याचदरम्यान लक्ष्मी देवी, रेखा पाठक, मंजू व्यास यांची भेट झाली. मग लक्ष्मी देवी यांचे पती सोहनलाल आर्य यांच्या मदतीने आम्ही वकील हरिशंकर जैन यांना दूरध्वनीवरून बोललो. त्यानंतर याचिका दाखल केली. सीता म्हणाल्या, रेखा पाठक वडिलांसोबत लहानपणी मंदिरात जात.

केवळ चबुतऱ्याची पूजा, १९९१ पासून देवीचे दर्शन बंद
सीता साहू म्हणाल्या, माता श्रृंगार गौरीचे दर्शन होत नाही. तेथे चबुतरा आहे. त्याची पूजा होते. माता गौरीचा संपूर्ण परिवार म्हणजे कार्तिकेय, गणेश, विशेश्वर नाथ असे सर्व परिसरात आहेत. १९९१ पासून मातेचे दर्शन बंद झाले. प्रशासनाने त्यावर बंदी घातली. बाबा विशेश्वर नाथ व माता श्रृंगार गौरी मंदिर नागर शैलीत बनलेले आहेत. या शैलीतील मंदिरांची बनावट विशिष्ट दगडांपासून केली जाते. त्यात आठ मंडप असतात. मुक्ती मंडप, दंडपाणी मंडप, यज्ञ मंडप, कुबेर मंडप, श्रृंगार मंडप, गणेश मंडप, ऐश्वर्य मंडप आहेत. श्रृंगार मंडप मंदिराच्या मुख्य द्वारासमोर होता. बाबा विशेश्वरनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आधी माता श्रृंगार गौरीची परवानगी घ्यावी लागते, अशी श्रद्धा आहे. दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरे नागर शैलीतील आहेत. सीता साहू म्हणाल्या, औरंगजेबाने वाराणसीत मंदिरे तोडण्याचे आदेश दिले होते. तेव्हा माता श्रृंगार गौरीचा मंडप पडला. त्यानंतर विशेश्वर नाथाचे मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद बनवण्यात आली.

पूजनाचा अधिकार मिळावा यासाठी २६ वर्षांपूर्वीची याचिका
लक्ष्मी देवी : वाराणसीतील नई सडक येथील रहिवासी सोहनलाल आर्य यांच्या पत्नी लक्ष्मी देवी गृहिणी आहेत. त्या श्रृंगार गौरी ज्ञानवापी प्रकरणातील पक्षकार आहेत. सोहनलाल आर्य यांनी २६ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी अॅडव्होकेट कमिश्नर नियुक्त झाले होते. चौकशीचे आदेशही दिले.

सीता साहू : सीता साहू वाराणसीतील चेतगंजच्या रहिवासी आहेत. चैत्र नवरात्रीत एक दिवसाच्या पूजनाला परवानगी मिळावी म्हणून वकील जैन यांच्याद्वारे याचिका दाखल केली.

मंजू व्यास : वाराणसीच्या रामघाट गल्लीतील रहिवासी मंजू व्यास श्रृंगार गौरी व ज्ञानवापीप्रकरणी याचिकाकर्ता आहेत. सर्व महिला सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी येथे दर्शनासाठी जात असत. परंतु उंबऱ्यावरून माघारी यावे लागे. मंदिर वर्षभर खुले असावे अशी मागणी आहे.

रेखा पाठक: वाराणसीच्या हनुमान फाटक भागातील रहिवासी रेखा पाठकही रोज दर्शन घेता येत नसल्याने त्रस्त होत्या. त्यांनी विश्व वैदिक सनातन संघाद्वारे याचिका दाखल केली.

राखी सिंह : दिल्लीच्या हौज खासमध्ये राखी राहतात. त्या वैदिक सनातनशी संबंधित आहेत. त्या खटल्यातून बाहेर पडल्याची अफवा होती.

बातम्या आणखी आहेत...