आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Petrol And Diesel Prices Increase By Government Oil Companies | Latest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईपासून दिलासा नाहीच:अर्थसंकल्पाच्या तीन दिवसानंतर वाढल्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमती, दिल्लीत पेट्रोल 86.65 तर मुंबईत 93.18 रु/लिटर

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंगानगरमध्ये सर्वात महाग डीझेल-पेट्रोल

सरकारी तेल कंपन्यांनी 7 दिवसानंतर परत एकदा पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढवल्या आहेत. राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये 31 आणि 35 पैशांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 86.65 रुपये प्रती लिटर आणि डीझेल 76.83 रुपये विकल्या जात आहे. येथे 1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 2.94 रुपये आणि डीझेलच्या 2.96 रुपयांनी वाढल्या आहेत.

गंगानगरमध्ये सर्वात महाग डीझेल-पेट्रोल

मुंबईमध्ये पेट्रोल 93.18 रुपये आणि डीझेल 83.65 रुपये प्रती लिटरच्या किमतीवर विकले जात आहे. तर, देशात सर्वाधिक भाव राजस्थानच्या गंगानगरमध्ये आहे. येथे पेट्रोल 96.94 रुपये आणि डिझेल 88.70 रुपयांनी विकले जात आहे.

पेट्रोल-डीझेलवर नवीन सेस लागू

2 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डीझेलवर अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस लागू करम्यात आला आहे. सेस पेट्रोलवर प्रती लिटर 2.5 रुपये, तर डीझेलवर 4 रुपये प्रती लिटर लागू आहे. परंतु, 2 दिवसांपासून तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. पण, तीन दिवसानंतर दोन्ही फ्यूलमध्ये वाढ झालेली दिसली. पेट्रोल-डीझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर कर जोडल्यानंतर याची किमत दुप्पट होते.

वाढत्या किंमतींमुळे जनता त्रस्त, सरकारला मालामाल

2014 मध्ये पेट्रोलवर 9.48 रुपये आणि डीझेलवर 3.56 रुपय एक्साइज ड्यूटी लागत होती. नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान सरकारने याला वाढवले होते. या 15 महिन्यात पेट्रोलवरील एक्साइज ड्यूटी वाढून 11.77 रुपये और डीझेलवर 13.47 रुपये झाला. यामुळे सरकारची कमाईदेखील वाढली. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट (CGA)नुसार, 2020 च्या एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान पेट्रोल आणि डीझेलवर एक्साइज ड्यूटी कलेक्शनमध्ये 48% वाढीची नोंद झाली. आठ महिन्यात एक्साइज ड्यूटी कलेक्शन 1.96 लाख कोटी रुपये राहिला, जो मागच्या वर्षी 1.32 लाख कोटी रुपये होता.

कच्चा तेलाच्या किमती वाढल्या

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल खरेदी करणारा देश आहे. 2019-20 मध्ये अंदाजे 101.4 अब्ज डॉलरचे कच्चे तेल खरेदी केले आहे. गुरुवारी इंटरनॅशनल ऑइल मार्केटमध्ये कच्चा तेलाची किंमत 58.62 डॉलर प्रती बॅरल होती, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडियट (WTI) क्रूड 55.92 डॉलर प्रती बॅरल आहे. मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे कच्चा तेलाच्या किमतीत कपात होऊन सर्वात कमी 19.90 डॉलर प्रती बॅरलवर आली होती.