आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Petrol Diesel Became Expensive For The Third Consecutive Day, So Far In October, Petrol Became Costlier By Rs 5.25 And Diesel By Rs 5.75

इंधनाच्या वाढत्या किंमती:सलग तिसऱ्या दिवशी महाग झाले पेट्रोल-डिझेल, ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत पेट्रोल 5.25 आणि डिझेल  5.75 रुपयांनी महागले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरमध्ये 17 व्या वेळी किंमत वाढली

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत देखील 35 पैशांनी वाढ केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 106.89 रुपये प्रति लीटरवर गेला आहे. त्याचबरोबर डिझेल 95.62 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 112.78 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर डिझेल 103.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहरपेट्रोल (रुपये/लीटर)डिझेल(रुपये/लीटर)
नवी दिल्ली106.8995.62
मुंबई112.78103.63
कोलकता107.4498.73
चेन्नई103.9299.92
नोएडा104.0896.26
बंगळुरु110.61101.49
हैद्राबाद111.18104.32
पटना110.44102.21
जयपूर114.11105.34
लखनऊ103.8696.07
गुरुग्राम104.4996.37
चंदिगड102.8895.33

ऑक्टोबरमध्ये 17 व्या वेळी किंमत वाढली
या महिन्यात 22 दिवसात पेट्रोल आणि डिझेल 17 वेळा महाग झाले आहे. यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 5.25 रुपयांनी तर डिझेल 5.75 रुपयांनी महाग झाले आहे. दुसरीकडे, जर आपण 2021 बद्दल बोललो तर या वर्षी 1 जानेवारी रोजी पेट्रोल 83.97 रुपये आणि डिझेल 74.12 रुपये प्रति लीटर होते. आता ते 106.89 रुपये आणि 95.62 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजेच, 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल 22.92 रुपयांनी आणि डिझेल 21.50 रुपयांनी महाग झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...