आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर सर्वसामान्यांना केंद्र सरकारने महागाईचा शॉक दिला आहे. देशभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका असल्यामुळे गेली चार महिने सिलिंडरसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोल 110.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.00 रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. त्याच तुलनेत दिल्लीत पेट्रोल 96.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.47 रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच देशाची राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोलचे दर तब्बल एका लिटरमागे तब्बल 14 रुपयांनी महाग आहे. तसेच, डिझेलही तब्बल 9 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे राज्यातील वाहतुकदारांनाही याची झळ बसणार असून जीवनावश्यक वस्तूदेखील महागण्याची शक्यता आहे.
याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 105.51 रुपये प्रति लिटर, डिझेल 90.62 रु/लिटर आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.16 आणि डिझेल 92.19 रुपये प्रति लिटर झाले आहे.
विनाअनुदानित सिलिंडर 949.50 रुपयांवर
14.2 किलोचा विनाअनुदानित सिलिंडर आता 949.50 रुपयांना मिळणार आहे. 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 349 रुपयांना, 10 किलोचा 669 रुपयांना आणि 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2003.50 रुपयांना मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर
मुंबई
पेट्रोल – 110.82
डिझेल – 95.00
पुणे
पेट्रोल - 110. 35
डीझेल - 93.14
नाशिक
पेट्रोल - 110.64
डिझेल - 93.43
औरंगाबाद
पेट्रोल - 111.64
डिझेल - 95.79
अकोला
पेट्रोल -110.58
डिझेल - 93.39
नांदेड
पेट्रोल - 113.14
डिझेल - 95.84
परभणी
पेट्रोल -113.50
डिझेल - 96.17
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
दरम्यान, निवडणुका संपून काही दिवस होत नाही तोच पेट्रोल-डिझेल व सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी यावर गमतीदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. पाहूयात त्यातीलच काही प्रतिक्रिया....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.