आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Petrol Diesel Price ; Petrol Diesel ; Petrol Diesel Became Expensive For The Third Time This Month, Petrol In Mumbai Is At Rs 101.30 Per Liter In

महागाईचा मारा:या महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या पेट्रोल-डीझेलच्या किमती, मुंबईत 101.30 तर परभणीत 103.61 रुपये/लिटर भाव

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये(106.09 रुपये/लिटर) मिळत आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज या महिन्यात तिसऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. देशातील अनेक भागात पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत 101.30 तर परभणीत राज्यातील सर्वात जास्त 103.61 रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळत आहे. तसेच, देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये मिळ असून, तिथे एका लिटरसाठी 106.09 रुपये मोजावे लागत आहेत.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डीझेलच्या किमती

शहरपेट्रोल (रुपये/लिटर)डीझेल (रुपये/लिटर)
श्रीगंगानगर106.0998.95
रीवा105.4796.64
परभणी103.6194.14
भोपाळ103.2394.56
जयपूर101.6594.87
मुंबई101.3093.35
दिल्ली95.0385.95

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यात पेट्रोल 100 च्या पुढे

देशातील प्रमुख राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा भाव 100 रुपये/लिटर झाला आहे. तर, तेलंगाणामधील अनेक ठिकाणी एका लिटर पेट्रोलसाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

मे महिन्यात पेट्रोल 3.83 आणि डीझेल 4.42 रुपयांनी महागले
मे महीन्यात पेट्रोल-डीझेलच्या किमतीत 16 वेळा वाढ झाली. यादरम्यान, पेट्रोल 3.83 आणि डीझेल 3.88 रुपयांनी महागले. त्यापूर्वी, पेट्रोल 90.40 आणि डीझेल 80.73 रुपए/लिटर दराने मिळत होते. यावर्षी 1 जानेवारीला पेट्रोल 83.97 आणि डीझेल 74.12 रुपये/लिटर दराने मिळत होते. अवघ्या 5 महीन्यांच्या कालावधीत पेट्रोल 11.06 आणि डीझेल 11.83 रुपयांनी महागले.

बातम्या आणखी आहेत...