आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Petrol Diesel Price ; Petrol ; Diesel ; Petrol Price Crosses Rs 100 In Rajasthan, Rs 94.18 In Bhopal And Rs 92.86 In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिन्यात दहाव्यांदा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती:मुंबईत पेट्रोल 92.86 रुपये लीटर, राजस्थानमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 च्या पार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये 10 वेळा वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा किंमती वाढल्या आहेत आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 92.86 रुपये लीटर झाले आहे.

राज्यासोबतच देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये 86.30 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये 10 वेळा वाढ झाली आहे. आज डीझेल आणि पेट्रोल दोन्हीमध्येही 25-25 पैशांनी वाढ झाली. यापूर्वी सोमवारीही डीझेल-पेट्रोलच्या किंमती वाढल्या होत्या.

जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल 2.59 आणि डीझेल 2.61 रुपये/ लीटर महाग झाले. या महिन्यात दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये 2.59 रुपये आणि डीझेलमध्ये 2.61 रुपयांची वाढ झाली आहे. 7 डिसेंबरला दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71 रुपये आणि डीझेल 73.87 रुपये लीटर होते. यानंतर 29 दिवस याच्या किंमती वाढल्या नाहीत. 6 जानेवारीला या महिन्यात पहिल्यांदा किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमती

शहराचे नावपेट्रोल (रुपये/लीटर)डिझेल(रुपये/लीटर)
दिल्ली86.3076.48
मुंबई92.8683.30
भोपाळ94.1884.46
जयपूर93.8485.93
चंदीगड83.0776.21
पानीपत83.6876.37
पाटणा88.7681.63
रांची84.8680.99