आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Petrol Diesel Price Today ; Petrol ; Diesel ; In Delhi Was Rs 90.78 And In Mumbai It Was Rs 97.19, In Many Cities Petrol Is Still Rs 100. At Over

सलग दुसऱ्या स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल:मुंबईत पेट्रोल 97.19 रुपये तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अजुनही 100 रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेल कंपन्यांनी दोन दिवसांत तेलाच्या दरांमध्ये 39 पैसे व 37 पैशांनी घट केली

देशात पेट्रोल-डिझेल या तेलाच्या दरांमध्ये काही दिवसांपासून शंभरी पार केली होती. परंतु, इतर राज्यात जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतशी तेलाच्या किंमतीत घट होतांना दिसत आहे. आज तारीख 25 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोलमध्ये 21 पैसे तर डिझेलमध्ये 20 पैसे घट झाली. दिल्लीत आज गुरुवारी पेट्रोलचे भाव 90.78 रुपये तर डिझेलचे 81.10 रुपये प्रति लीटरवर आले आहे. तर गेल्या बुधवारी तेलाच्या दोन्ही किंमतीमध्ये पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले होते.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरपेट्रोल (रु. प्रति लिटर)डीझेल (रु. प्रति लिटर)
श्रीगंगानगर101.4393.39
रीवा100.8591.27
भोपाळ98.8189.37
दिल्ली90.7881.10
मुंबई97.1988.20
जयपूर97.3189.60

६ महिन्यांत पेट्रोलचे दर १०.११ रुपयांनी वाढवले
सलग २४ दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर राहिल्यानंतर बुधवारी त्यात किरकोळ घट झाली. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाले. यापूर्वी २७ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलची दरवाढ करण्यात आली होती. नव्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.९९ रुपये आणि डिझेल ८१.३० रुपये प्रतिलिटर झाले आहे. यापूर्वी शेवटची दरकपात २२ सप्टेंबर २०२० ला झाली होती. तेव्हा पेट्रोल ८ पैसे स्वस्त झाले होते. गेल्या ६ महिन्यांत पेट्रोलचे दर १०.११ रुपयांनी वाढवले. कपात मात्र केवळ १८ पैशांची झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरले
कच्च्या तेलाच्या दरांत प्रचंड घसरण आहे. ब्रेंट क्रूडची किंमत ६.५२ % घसरून ६ आठवड्यांनंतर ६०.७३ डॉलर प्रतिबॅरल झाली. गेल्या १५ दिवसांत कच्च्या तेलाचे दर १५ %पेक्षा जास्त घटले. तथापि पेट्रोलच्या दरात ०.२ टक्क्यापेक्षाही कमी कपात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...