आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा ‘मार्च’:पेट्रोल-डिझेलच्या किमती 137 दिवस स्थिर राहिल्यानंतर 80 पैसे/लि. वाढल्या, घरगुती गॅस सिलिंडरही 50 रु. महाग

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्यांतील निवडणुकीमुळे १३७ दिवस स्थिर राहिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती मंगळवारपासून ८० पैसे/लि. वाढल्या. कारण क्रूड आॅइल ११५ डॉलर/बॅरलच्या पार गेले आहे. ४ नोव्हेंबरला क्रूड ८१.६ डॉलर/बॅरल होते. त्यानुसार तेल कंपन्या नुकसान टाळण्यासाठी १७ रु./लि. पर्यंत दर वाढवू शकतात. कारण क्रूड १ डॉलर महाग होते तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर ५० पैसे/लि. वाढतात. पेट्रोलवर उत्पादन शुल्क अजूनही प्री-कोविडपासून ८ रु., डिझेलवर ६ रु. जोस्त आहे.

पेट्रोल-डिझेल; ४ महिन्यांत क्रूड ३४ डॉलरवर, १७ रु. वाढू शकतात दर
दिल्लीत मार्च २१ मध्ये पेट्रोल ९१ रु. आणि डिझेल ८१ रु. होते. एका वर्षात पेट्रोल व डिझेल ६-६ रु. महागले आहे.
राज्यसभेत पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर काँग्रेस, टीएमसी आदींनी गदारोळ केला. लोकसभेत विरोधी पक्षाने वॉकआऊट केले.

िसलिंडर; १६६ दिवसांनी दरवाढ, १२ महिन्यांत ~१४० उसळी, आता हजोर देशाची सर्वात मोठी तेल-गॅस कंपनी इंडियन आॅइलने १६६ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर ~५० पर्यंत महाग केले आहे. मप्र, यूपी, बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमधील ११ शहरांत सिलिंडर एक हजोरच्या पार गेले आहे. दिल्लीत ९४९.५० रु. दर आहे. १ मार्च २०२१ रोजी ८१९ रु. होता. म्हणजेच वर्षभरातच सुमारे १४० रुपयांनी महागले. युक्रेन युद्धामुळे क्रूड ४०% महागले. ते १८५ डॉलरपर्यंतही जोऊ शकते. अशा वेळी किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीत सिलिंडर ९४९.५ रुपयांपर्यंत पोहोचले
२२ मार्च २२ ९४९.५०
६ ऑक्टोबर ८९९.५०
२१ सप्टेंबर ८८४.५०
१८ ऑगस्ट ८५९.५०
१ जुलै ८३४.५०
२५ फेब्रुवारी २१ ७९४.००
(आकडे दिल्लीचे)

मागील ८ वर्षांत सिलिंडर दुप्पट महागले आहे. मार्च २०१४ मध्ये दिल्लीत ४१०.५ रुपये होते, आता ९४९.५ रुपये आहे. पाटण्यात सिलिंडर सर्वात महाग १०४८ रु. आहे. भिंडमध्ये (मप्र) १०३१ रु., ग्वाल्हेर १०३३.५ रु. आणि मुरैनात १०३३ रु. आहे.

हेही महाग; दूध-चहा-कॉफी अन् मॅगीसह सीएनजी गॅसही महागला
मार्च महिन्यात पेट्रोलियम पदार्थांसह दूध, चहा, काॅफी, मॅगी आणि सीएनजी गॅसही महागला आहे. अमूल, मदर डेअरी आणि परागने दूध २ रु./लि. महाग केले. तर मप्रमध्ये सांची मिल्कने ५ रु. वाढवले. मॅगीही २ ते ३ रु. महागली. छोट्या पॅकवर २ रु. आणि मोठ्यावर ३ रुपयांची वाढ केली आहे. नेसकॅफे क्लासिक, ब्रू काॅफी आणि ताजमहाल चहाच्या किमतीही ३ ते ७% वाढवल्या. दिल्लीत सीएनजी ५० पैसे/किलोपर्यंत महागले आहे.

दुधाचे गणित; पशुपालकास किमतीच्या ६०% मिळतात, ६० रु./लि. वर ३६ रुपये देतात दुग्ध कंपन्या पशुपालकांसोबत थेट करार करत दुधाच्या किमती निश्चित करतात. बाजोर मूल्याच्या ६०% पशुपालकास देतात. मागणी, पुरवठा, खर्चाद्वारे दर ठरतो. मशीन आणि विजेचा खर्च जोडला जोतो. पशुखाद्याची किंमत पीक आणि पावसाची स्थिती पाहूनच निश्चित केली जोते.

चारा म्हणून वापरली जोणारी सरकी ढेप ५०-६०%, सोया, मोहरी, शेंगदाणा ढेप व वीज महागल्यानेही दुधाच्या किमती वाढल्या. परिवहन, तेल, खाद्य उत्पादनांसह कच्चा माल महागल्याने आणि पॅकिंगसाठी पॉलिथिनचे दर वाढल्याचा परिणाम आहे.

बातम्या आणखी आहेत...