आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Petrol diesel Prices Rise For 12th Consecutive Day, Petrol Reaches Rs 84.66 And Diesel Rs 74.93 In Mumbai Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल-डिझेलचा भडका:देशात सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, मुंबईत पेट्रोल 84.66 तर डिझेल 74.93 रुपयांवर पोहचले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 9 टक्के आणि 10 डिझेल 10 टक्क्यांपेक्षा महाग झाले

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज सलग बाराव्या दिवशी कायम राहिली. दिल्लीत पेट्रोल 78 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचले आहे. तर डिझेलची किंमत पहिल्यांदाच 76 रुपये प्रति लिटर झाली आहे. देशात 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. या 12 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 9 टक्के आणि 10 डिझेल 10 टक्क्यांपेक्षा महाग झाले आहे. यादरम्यान पेट्रोलच्या किमतीत 6.55 रुपये तर डिझेलच्या किमतीत 7.04 रुपयांची वाढ झाली. 

देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमतीत 53 पैशांनी वाढ होऊन 77.81 रुपये प्रति लीटर झाली आहे. 10 नोव्हेंबर 2018 नंतर पहिलीच उच्चांकी आहे. डीझलच्या किमतीत 64 पैशांची वाढ होऊन पहिल्यांदा 76 रुपयांच्या पार 76.43 रुपये प्रति लीटर झाली आहे. 

दरम्यान आज कोलकाता आणि मुंबईतही पेट्रोलच्या किंमतीत प्रत्येकी 51 पैशांची वाढ झाली. कोलकातामध्ये 79.59 आणि मुंबईत 84.66 रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईत हे दर 46 पैशांनी वाढून 81.32 रुपये प्रति लिटर राहिले. डिझेल कोलकातामध्ये 58 पैशांनी वाढून 71.96 रुपये, मुंबईत 61 पैशांनी वाढून 74.93 रुपये आणि चेन्नईत 54 पैशांच्या वाढीसह 74.23 रुपये प्रति लिटर दर झाले. 

देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती (रुपये प्रति लिटरमध्ये)

महानगर-----------पेट्रोल-----------------डिझेल 

दिल्ली------------77.81(+0.53)-------76.43(+0.64)

कोलकाता---------79.59(+0.51)-------71.96(+0.58)

मुंबई-------------84.66(+0.51)-------74.93(+0.61)

चेन्नई------------81.32(+0.46)-------74.23(+0.54)

बातम्या आणखी आहेत...