आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Petrol Disel Price Hike । Petrol diesel Prices Will Go Up By Rs 10 Next Year Due To Rising Crude Oil Prices

दिलासा नाहीच:कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पुढच्या वर्षी पेट्रोल-डिझेलच्या किंमती 10 रुपयांनी वाढ होणार; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल 85 डॉलर बॅरेलवरून 100 डॉलर बॅरेलवर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात सलग इंधन वाढ सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अशातच इंधनाचे दर केव्हा कमी होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असताना आता पुन्हा इंधन दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

बॅचमार्क ब्रॅट क्रूडचा म्हणजेच कच्चा तेलाचा दर सध्या 85 डॉलर प्रति बॅरल असून, पुढील तीन ते सहा महिन्यात त्याचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ सकते. त्यामुळे सध्याचे असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर यात वाढ होऊन सर्वसामान्यांच्या खिशात अधिकचे 8-10 रुपये प्रतिलीटरमागे मोजावे लागणार आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या जास्त वॅटदर असणाऱ्या राज्यात याहीपेक्षा जास्त दरवाढ होऊ शकते.

इराकचे तेलमंत्री एहसान अब्दुल जब्बारी यांच्या नुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि मार्चदरम्यान कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होऊन 100 डॉलर प्रति बॅरेलवर जाणार आहे. सध्या कच्चा तेलाचे दर 85 डॉलर प्रति बॅरेल असून, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच याचे दर वाढणार आहे. त्यामुळे भारताला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे, कारण भारत हा सुमारे 85 टक्के कच्चा तेल इराकवरून आयात करते.

पेट्रोलियम वाढणार

एसअॅण्डपी ग्लोबल प्लॅट्स अॅनालिटिक्स नुसार, भारतात येत्या काही काळात आणखी इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. रेटींग एजेन्सी इक्राचे प्रमुख प्रशांत वशिष्ठ यांनी सांगतले की, जर कच्चा तेलाची किंमत प्रतिबॅलेर मागे 1 डॉलरने माहागली तर देशात पेट्रोल-डिझेल 55-60 पैशांनी महाग होते. अशातच जर 85 डॉलर प्रतिबॅलेर वरून जर 100 डॉलर प्रतिबॅलेर तेल झाले तर, जनेतला लीटरमागे 10 रुपये अधिकचे मोजावे लागेल.

भारताची क्रूड आयातीसाठी रणनीती
कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर 100 पार करून पुढे गेले आहे. पेट्रोल 110 तर डिझेल 100 रुपये प्रतिलीटर झाल्याने सरकारवर देशातील जनता आक्रमक झाली आहे. त्यामुळे सरकार कमी दरात कच्चे तेल आयात करण्याची रणनीती आखत आहे.

पेट्रोलियम सचिव तरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार प्रायव्हेट आणि रिफाइनिंग कंपन्यांचा एक समुह तयार करत आहे. कारण भारत जगातील तीसरा मोठा कच्चा तेल घेणारा देश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे महाग होण्याचे कारणे

  • जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे खुली झाल्याने मागणी झपाट्याने वाढली आहे. तसेच हिवाळी हंगाम आल्याने अमेरिकेत शेल तेलाचे उत्पादन घटले आहे.
  • पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांची संघटना आणि त्याचे सहयोगी (OPEC+) दररोज केवळ 4 लाख बॅरल्सने उत्पादन करत आहे.
  • OPEC+ द्वारे कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ असूनही, त्यांची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा सुमारे 14 टक्के कमी आहे
  • कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्याने तसेच गॅसदेखील महाग झाल्याने कच्चा तेलावर अतिरिक्त आधार पडला आहे. गॅसऐवजी आता जनता तेल वापरत आहे.
बातम्या आणखी आहेत...