आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत-नेपाळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर कमी वर्दळ असते. दोन्ही देशांना जोडणाऱ्या गावातील रस्ते खडबडीत आणि अरुंद आहेत. नेपाळ आणि भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सरासरी २१ ते २५ रुपयाचा फरक आहे. परिणामी नेपाळमधील पंपाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. नेपाळला भारत तेल पुरवतो तरीही ही परिस्थिती आहे. जोगबनी जवळील राणी विराटनगर, बौद्धनगर भेरियाही, सुपौल जवळील भीमनगर, रक्सौल जवळील वीरगंज, सीतामढी जवळील गौड, मलंगवामध्ये सारखीच परिस्थिती आहे. नेपाळमधून रोज येणाऱ्या जाणाऱ्यांच्या व्यतिरिक्त नदी-नाल्यातून लोक भारतीय भागात तेल विकत आहेत. त्यामुळेच भारतीय सीमावर्ती भागात पेट्रोल आणि डिझेलची विक्री १००० ते १२००० लिटरपर्यंत कमी झाली आहे.
२ किमी अंतरावर २२ रुपये स्वस्त मिळते तर महाग का घेणार ?
बिहारमध्ये पेट्रोल ९५ रुपये लिटर आहे. भारतापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेत पेट्रोल २३.५५ रुपये व डीझल २१.९८ रुपये स्वस्त आहे. नेपाळमध्ये शनिवारी पेट्रोल ११४ नेपाळी (७१.५६ भारतीय) तर डीझल ९८.५० (६१.२५ भारतीय) नेपाळी रुपए होते. शेजारी देशात पेट्रोल डीझल इतके स्वस्त मिळतेय तर आम्ही का घेऊ नये ? असे लोक म्हणतात. नुकतेच दोन्हीकडच्या तस्करांना पकडले होते. भारतीय लोकांनी प्रशासनाला विनंती केली. त्यामुळे इंडो नेपाळ बॉर्डरचे पश्चिमी चंपारण, सीतामढ़ी, मधुबनी, अररियाचे नेपाळ सीमेजवळील १५० पेट्रोल पंपावरुन रोज सुमारे ४ लाख लिटर नेपाळी इंधन बिहारच्या गाड्यात भरले जात आहे.
भारत, नेपाळला तेल का देतो ?
जुना करार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आखाती देशांमधून नेपाळला इंधन पुरवते. तेलाच्या बदल्यात नेपाळ आणि भूतान हे दोन देश भारताला डॉलर देतात.
नेपाळला बिहारमधून तेल जाते ॽ
डीझल बरौनी डिपोवरुन पाइपलाइनमधून, तर पेट्रोल टँकरने जाते. मुख्य मार्ग रक्सौल-वीरगंज आहे. अलाहाबाद, गोंडा, सिलीगुड़ी, बेतालपुर डिपोमधूनही तेल जाते.
आपले महाग आणि त्यांचे स्वस्त का?
भारत, रिफायनरी फी आणि खरीद मूल्यावरच नेपाळला तेल देतो.
नेपाळमध्ये टॅक्स कमी का ?
नेपाळमध्ये फक्त एक टॅक्स आहे. तेदेखील भारताच्या एक्साइज ड्यूटीपेक्षा कमी आहे.
(तज्ञ- ऑयल नेपाळ फेडरेशनचे मनोज दास, बिहार डिलर असोचे रामाधार पांडेय)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.