आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Petrol Is Priced At Rs 100 In Rajasthan, Rs 97.52 In Bhopal And Rs 96 In Mumbai. Liters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेब्रुवारीत पेट्रोल-डिझेलचे दर 11व्या वेळेस वाढले:राजस्थानात पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे, भोपाळमध्ये  97.52 रु आणि मुंबईत 96 रु. लिटर

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पहिल्यांदाच पेट्रोलचे दर 100 रु. प्रति लिटरवर पोहोचले आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये बुधवारी सकाळी पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे ऑइल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25-25 पैशांची वाढ केली आहे. सलग नवव्या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 89.54 रु.आणि मुंबईत 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

या वर्षात 21 वेळेस पेट्रोल 5.83 रु. आणि डिझेल 6.18 रु. महाग झाले
फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 वेळेस वाढ झाली आहे. या दरम्यान दिल्लीत पेट्रोल 3.24 रुपये आणि डिझेल 3.47 रुपये महाग झाले. यापूर्वी जानेवारीत 10 वेळेस इंधन दरवाढ झाली. या दरम्यान पेट्रोल 2.59 रुपये आणि डिझेल 2.61 रुपये महाग झाले होते. 2021मध्ये आतापर्यंत पेट्रोल 5.83 रु. आणि डिझेल 6.18 रु. प्रति लिटर महाग झाले आहे.