आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियमिततेवर लक्ष:पेट्रोलियम नियामक, पेन्शन, प्रतिस्पर्धाचा अध्यक्षांविना कारभार

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा, पेन्शन आणि पेट्रोलियम नियामकाला अनेक महिन्यापासून चेअरमन मिळाले नाहीत. पेट्रोलियम अँड नॅचुरल गॅस रेगुलेटरी मंडळात तर दोन वर्षांपासून चेअरमनचे पद रिक्त आहे. ही पदे लवकर भरण्याची शक्यताही कमी आहे. एक नजर सद्यस्थितीवर... {सीसीआय केंद्राने चार महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) नवीन अध्यक्षांसाठी अर्ज मागवले आहेत. अशोक कुमार गुप्ता

यांनी गेल्या वर्षी २५ ऑक्टोबरला राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. {पीएनजीआरबी|पेट्रोलियम अँड नॅचुरल गॅस रेगुलेटरी बोर्ड (पीएनजीआरबी)दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून अध्यक्षविना काम करत आहे. या संस्थेने दोनदा जाहिरात दिली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये शेवटची जाहिरात देण्यात आली होती. यापूर्वीचे अध्यक्ष दिनेश के सराफ हे ४ डिसेंबर २०२० रोजीच निवृत्त झाले. तेव्हापासून पीएनजीआरबीचे अध्यक्षपद रिक्त आहे. शासनाने उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू केली होती, मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही.

{पीएफआरडीए|सरकारने पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए)चे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्यायचे उत्तराधिकारी शोधणे सुरू केले आहे. त्यांचा कार्यकाल यावर्षी १६ जानेवारीला संपला.

{निर्णय अडकले |नियामकांमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्याने महत्त्वाचे निर्णय रखडत असल्याचे तज्ञांचे मत आहे. नियामक कमकुवत दिसत आहेत. हा सुशासनाचा मार्ग नव्हे. या परिस्थितीमुळे कॉर्पोरेट जगतात चुकीचा संदेश जात आहे.

{कार्यवाही करू शकत नाही सीसीआय|पदावरील व्यक्त निवृत्त होण्याच्या तीन महिन्या आधीच निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते. आर्थिक सेवा विभागाचे माजी सचिव डीके मित्तल सांगतात, ‘नोकरशाहीने या बाबतीत अधिक भर देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, कोरम पूर्ण न झाल्यामुळे सीसीआय ऑक्टोबरपासून प्राप्त झालेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई करू शकली नाही, तर तीन सदस्य असताना कोरम पूर्ण होते. पण अध्यक्ष म्हणून आजपर्यंत नियुक्ती झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...